Bollywood : ईशा कोप्पीकर पती टिमी नारंगपासून लग्नाच्या 14 वर्षानंतर विभक्त, घटस्फोटाबद्दल अभिनेत्री म्हणाली....

| Published : Dec 28 2023, 01:52 PM IST / Updated: Dec 28 2023, 01:54 PM IST

Isha Koppikar and Timmy Narang separated after 14 years of marriage
Bollywood : ईशा कोप्पीकर पती टिमी नारंगपासून लग्नाच्या 14 वर्षानंतर विभक्त, घटस्फोटाबद्दल अभिनेत्री म्हणाली....
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बॉलिवूडमधील 'कृष्णा कॉटेज', 'क्या कूल हैं हम' सारख्या सिनेमातून झळकलेली अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा संसार लग्नाच्या 14 वर्षानंतर मोडला आहे. ईशाने पतीचे घर सोडल्याचेही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

Isha Koppikar Separation : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोट आणि लग्न होणे सेलेब्ससाठी एक सामान्य बाब झाली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील काही कपल्स असे आहेत जे आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. वर्षानुवर्षे एकत्रित संसार केल्यानंतर काही कलाकारांची लग्न मोडल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

अशातच आता अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिचा संसार मोडल्याची बातमी समोर आली आहे. ईशा कोप्पीकर पती टिमी नारंग (Timmy Narang) याच्यापासून विभक्त झाली आहे.

अभिनेत्रीने पती टिमी नारंग याचे घर सोडले आहे. ईशाला 9 वर्षांची मुलगी असून ती आता आपल्या आई-वडिलांच्या घरात राहत आहे. ईशा आणि टिमीने लग्नाच्या 14 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

घटस्फोटाचे कारण
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलेयं की, कपलने एकमेकांसोबत पटत नसल्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न मोडू नये यासाठी कपलने काही प्रयत्न देखील केले. पण ते विफोल ठरले.

याशिवाय ईशाने घटस्फोटावर प्रतिक्रिया देत म्हटले, माझ्याकडे आता बोलण्यासारखे काहीही नाही. मला प्रायव्हेसी हवी आहे.

टिमी आणि ईशाची पहिल्यांदाच भेट
ईशा कोप्पीकर आणि टिमी यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास दोघांची भेट जिममध्ये झाली होती. यानंतर टिमी आणि ईशामध्ये मैत्री झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. वर्ष 2009 मध्ये ईशाने टिमीसोबत लग्नगाठ बांधली. वर्ष 2014 मध्ये ईशाने मुलगी रियाना हिला जन्म दिला.

ईशाच्या कामाबद्दल थोडक्यात…
ईशा कोप्पीकर 'लव्ह यू लोकतंत्र' (Love You Loktantra) या सिनेमातून झळकली होती. हा सिनेमा वर्ष 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. ईशाचा तमिळ भाषेतील आगामी सिनेमा 'अयलान' (Ayalaan) वर्ष 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा: 

अंकिता लोखंडे-विक्की जैन यांचे रिलेशनशिप या कारणांमुळे आहे Unperfect

पॉप स्टार दुआ लिपा सोशल मीडियात होतेयं ट्रोल, नक्की कारण काय? वाचा सविस्तर...

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षातील फ्लॉप बॉलिवूड सिनेमे