इरफान पठाणने ॲनिव्हर्सरीनिमित्त आठ वर्षांत प्रथमच जगाला दाखवला पत्नीचा चेहरा

| Published : Feb 04 2024, 01:42 PM IST / Updated: Feb 04 2024, 02:02 PM IST

Irfan Pathan Reveals Wife Safa Baig photo

सार

लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त इरफान पठाणने पत्नी सफा बेगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास गोष्ट म्हणजे यात त्याच्या पत्नीचा चेहरा झाकलेला नाही.

Irfan Pathan Reveals Wife Safa Baig's Face : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) आपली पत्नी सफा बेगसाठी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक भावस्पर्शी पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच लग्नाच्या 8 वर्षात पहिल्यांदाच त्याने आपल्या पत्नीच्या चेहऱ्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे.इरफान पठाण व सफा बेग यांनी शनिवार 3 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला.

पहिल्यांदाच पत्नीचा चेहरा केला उघड

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अनेकदा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. परंतु यावेळी इरफानचे नाव क्रिकेटमुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. लग्न झालेले भारतीय खेळाडू अनेकदा त्यांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

पण इरफान पठाणने आजवर कधीही त्याच्या पत्नीचा चेहरा जगासमोर उघड केला नव्हता. जेव्हाही त्याने त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो पोस्ट केले होते, तेव्हा तेव्हा सफा बेगने तिचा चेहरा झाकलेला होता. यामुळे इरफानवर अनेकांनी टीका देखील केली होती की, जग इतक्या पुढे गेले तरीही हे लोक जुन्या रूढींमध्येच अडकलेले आहेत.

भावस्पर्शी मेसेज केला शेअर

आता मात्र लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त इरफान पठाणने पत्नी सफा बेगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास गोष्ट म्हणजे यात त्याच्या पत्नीचा चेहरा झाकलेला नाही. इरफानने लग्नाच्या 8 व्या वर्धापनदिनानिमित्त पत्नीसाठी एक प्रेमळ संदेश शेअर केला आहे.

इरफानने लिहिले की, “एकाच व्यक्तीने अनेक भूमिका साकारण्याची कला प्रावीण्य मिळवलेली ही व्यक्ती. माझे मन सांभाळणारी, विनोदी, खोडकर, प्रत्येक परिस्थितीत मला साथ देणारी माझी सखी, माझ्या मुलांची आई. माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट प्रवासात तू माझी पत्नी म्हणून कायम माझ्या बरोबर होतीस. लग्नाच्या आठव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

शुभमन गिल व श्रेयस अय्यरची बाजू घेतली

अलीकडेच इरफान पठाण खराब फॉर्म असूनही शुभमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचे समर्थन केल्यामुळे चर्चेत आला होता.

वृत्तानुसार, ‘विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूची अनुपस्थिती ही एक मोठी बाब आहे. त्यामध्ये केएल राहुललाही दुखापत झाली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाकडे विचार करण्यासारखे बरेच काही आहे. लगेच नव्या खेळाडूला संधी द्यायची की थोडी वाट बघायची हा विचार त्यांना करावा लागेल’, असे आशियाई लीजेंड्स लीगच्या लाँचच्या वेळी पठाणने वक्त्यव्य केले होते.

आणखी वाचा -

Poonam Pandey: 'मी जिवंत आहे' सांगत पूनम पांडेने पोस्ट केला व्हिडीओ

एबी डिव्हिलियर्सने केला खुलासा, विराट आणि अनुष्का पुन्हा होणार आई-बाबा

रामानंद सागर यांची 'Ramayan' मालिका पुन्हा होणार प्रसारीत, DD National ने जाहीर केली तारीख आणि वेळ