सार

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सांगितले की विराट कोहली ठीक आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे कारण अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे.

Virat Kohli : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli, Anushka Sharma) पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत असे एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना उपस्थित न राहण्याचे कारण उघड केले आहे

विराट त्याच्या कुटुंबाबरोबर बिझी आहे म्हणाला एबी डिव्हिलियर्स

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “विराट कोहलीने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला कारण विराटची पत्नी अनुष्का दुसऱ्यांदा गर्भवती आहे व विराट त्याच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाच्या तयारीसाठी कुटुंबीयांबरोबर वेळ घालवतो आहे.” इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विराटने माघार घेतली आहे. परंतु कुटुंबासाठी वेळ काढल्याबद्दल आरसीबी स्टार एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

एबी डिव्हिलियर्सने सांगितले की, “भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून भारताचा स्टार फलंदाज असणाऱ्या विराटने माघार घेतल्यानंतर मी त्याची चौकशी केली." एबी डिव्हिलियर्सने त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सांगितले की विराट कोहली ठीक आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे कारण अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे. एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि सांगितले की कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे. कुठल्याही व्यक्तीसाठी अपत्याच्या जन्माचे क्षण हे खूप महत्वाचे असतात. त्यामुळे यावेळी जर त्याने कुटुंबाला प्राधान्य दिले तर त्यासाठी त्याला दोष देऊ नये.

वैयक्तिक कारणासाठी कसोटी सामन्यांतून माघार घेतल्याचे दिले होते कारण

विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतली होती. बीसीसीआयने त्यांच्या सविस्तर निवेदनात चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांना विराटच्या या निर्णयावर शंका उपस्थित करू नयेत असे आवाहन केले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, कोहलीने बहुचर्चित कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून घेण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी फोनवर चर्चा केली.

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब शोमध्ये सांगितले की, “मला एवढेच माहित आहे की तो ठीक आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवत आहे, त्यामुळेच त्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली आहे. मी आणखी कशाचीही पुष्टी करणार नाही. त्याला परत भेटण्याची मी आतुरतेने वाट बघतो आहे.”

दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना शंकाकुशंका व अफवा पसरवू नका अशी विनंती करून देखील अशी अफवा पसरली होती की विराटच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने त्याने सामन्यातून माघार घेतली आहे. परंतु विराट कोहलीचा भाऊ विकास याने त्याच्या आईच्या तब्येतीबद्दलच्या अफवा फेटाळून लावल्या आणि सांगितले की त्यांच्या आईची प्रकृती ठीक आहे.

इंग्लंडविरुद्धच्या अंतिम तीन सामन्यांसाठी कोहली पुनरागमन करेल की नाही हे डिव्हिलियर्सने स्पष्ट केले नाही.

आणखी वाचा - 

रामानंद सागर यांची 'Ramayan' मालिका पुन्हा होणार प्रसारीत, DD National ने जाहीर केली तारीख आणि वेळ

देशातील या सिनेमांचे बजेट अंतरिम अर्थसंकल्पापेक्षाही अधिक, जाणून घ्या

Shaitaan Teaser Out : "एक खेल है खेलोगे? इस खेल का बस एक नियम है", अजय देवगणाच्या 'शैतान' सिनेमाचा टीझर प्रदर्शित