Jolly LLB 3: 'या' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनित 'जॉली एलएलबी ३' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेल्या या कोर्ट ड्रामाने पहिल्या दिवशी १२.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Jolly LLB 3: 'या' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
जॉली एलएलबी ३ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी काम केलं. या चित्रपटाचे पहिले दोन भाग चांगले चालले असून तिसरा भाग चांगला चालेल अशी प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
जॉली एलएलबी ३ चित्रपट झाला रिलीज
जॉली एलएलबी ३ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी या दोघांनी एकत्र काम केलं. हा चित्रपट शुक्रवारी आला असून त्याला चांगली ओपनिंग मिळाली आहे.
प्रेक्षकांनी चित्रपटाचे केले कौतुक
प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केलं आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून चित्रपटात हुमा कुरेशी आणि अमृता राव यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊयात.
कोर्ट ड्रामा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
कोर्ट ड्रामा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उत्सुक असल्याचं दिसून आलं आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी या दोघांनी तीनही भागांमध्ये चांगला अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक दिवस उलटून गेला आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटी रुपये कमावले?
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या जॉली एलएलबी ३ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.५० कोटी कमावले आहेत. शनिवार आणि रविवार या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
शनिवार आणि रविवार कमाई वाढण्याची शक्यता
जॉली एलएलबी ३ हा चित्रपट शनिवार आणि रविवार या दोन दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार आहे. जॉली एलएलबी २ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२ कोटी कमावले होते.

