अमिताभ बच्चन यांनी कर्मचाऱ्यांना किती दिला बोनस, वाचून तुम्ही बँक बॅलन्स कराल चेक
दिवाळीनिमित्त अमिताभ बच्चन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मिठाई आणि रोख रक्कम भेट दिली. एका कर्मचाऱ्याला 10,000 रुपये आणि मिठाईचा बॉक्स मिळाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या रकमेवर नाराजी व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी कर्मचाऱ्यांना किती दिला बोनस, वाचून तुम्ही बँक बॅलन्स कराल चेक
दिवाळी सणानिमित्त एकमेकांना मिठाई ही आवर्जून दिली जाते. ही मिठाई दिल्यामुळं एकमेकांमधील प्रेम वाढत जात. आपण दिवाळीचा फराळ एकमेकांकडे घेऊन जात असतो. आता एका अभिनेत्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ झाला व्हायरल
अमिताभ बच्चन यांचा गिफ्ट देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिठाई दिली. तो व्हिडीओ पाहून प्रेक्षक त्यांच्यावर नाराज झालेले दिसून आले.
कन्टेन्ट क्रिएटर काय म्हणाला?
कंटेंट क्रिएटरने यावेळी या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिठाई आणि रोख पैसे दिले जात असल्याचं पाहिलं. त्यानं ते पाहिल्यानंतर तो व्हिडिओमध्ये हे अमिताभ बच्चन यांचं घर आहे आणि येथे मिठाई वाटली जात आहे असं सांगतो.
कर्मचाऱ्यांना किती रक्कम दिली?
तो कॅमेरा फिरवून आजूबाजूचा परिसर दाखवतो. व्हिडिओमध्ये, एका स्टाफ सदस्याने स्पष्ट केले की मिठाईसोबत रोख रक्कम देखील देण्यात आली होती. त्याला किती पैसे मिळाले असे विचारले असता, त्याने उत्तर दिले, “10,000 रुपये आणि मिठाईचा बॉक्स.”
अनेकांनी व्यक्त केली नाराजी
अनेकांनी या व्हिडिओबाबत नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं. त्या व्हिडिओमध्ये खासकरून अनेकांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे तर काहींनी देण्यात आलेली रक्कम अतिशय थोडी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या निर्णयावर टीकाही झाली.
हे खूपच लाजिरवाणे
अनेकांनी ही रक्कम अतिशय कमी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी बोलताना यापेक्षा जास्त रक्कम द्यायला हवी होती अशी भावना व्यक्त केली आहे. यावेळी २० ते २५ हजारांचा बोनस द्यायला हवा होता असं म्हटलं आहे. दरम्यान, इतर सेलिब्रिटींनी किती पैसे दिले याची माहिती समोर आलेली नाही.

