- Home
- Entertainment
- अपघातानंतर विजय देवरकोंडाला भेटायला 'ही' अभिनेत्री पोहचली हॉस्पिटलमध्ये, तब्येतीची माहिती ऐकून बसेल धक्का
अपघातानंतर विजय देवरकोंडाला भेटायला 'ही' अभिनेत्री पोहचली हॉस्पिटलमध्ये, तब्येतीची माहिती ऐकून बसेल धक्का
विजय देवरकोंडा: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याच्या गाडीला एका बोलेरो गाडीने धडक दिली, मात्र तो सुखरूप आहे. या अपघातानंतर त्याच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अपघातानंतर विजय देवरकोंडाला भेटायला 'ही' अभिनेत्री पोहचली हॉस्पिटलमध्ये, तब्येतीची माहिती ऐकून बसेल धक्का
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा याच्या गाडीचा अपघात झाला. त्याच्या गाडीला बोलेरो गाडीने धडक दिली पण यामध्ये अभिनेत्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
विजयच्या ड्रायव्हरने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली दाखल
अपघात झाल्यानंतर विजयच्या ड्रायव्हरने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानंतर चौकशीला सुरुवात केली आहे. बोलेरो गाडीने टक्कर दिल्यानंतर न थांबता ती पुढं निघून गेली.
विजयने प्रतिक्रिया देताना काय म्हटलं?
‘सर्वकाही ठिक आहे… कारला टक्कर लागली आहे. पण आम्ही सर्व ठिक आहोत. मी स्टेंथ वर्कआउट देखील केलं आणि घरी परतलो आहे… डोकं दुखत आहे पण बिरयानी आणि झोप झाली की काहीही होणार नाही… तुम्हा सर्वांसाठी प्रेम… या बातमीमुळे त्रस्त होऊ नका… सर्वकाही ठिक आहे…’
पोलिसांनी जबाबात काय माहिती दिली?
पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी म्हटलं आहे की, ‘तेलुगु अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या कारची आज पुट्टापर्थीहून हैदराबादला जात असताना जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील उंडवल्ली येथे दुसऱ्या वाहनाची धडक झाली. अपघातात अभिनेत्याच्या कारचं नुकसान झालं आहे. पण कोणीही जखमी झालेलं नाही…’
रश्मीका मंदानासोबत ३ दिवसांपूर्वी झाला साखरपुडा
अभिनेता विजयचा अभिनेत्री रश्मीका मंदानासोबत ३ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. ३ ऑक्टोबर रोजी दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती समजली आहे. दोघांनी याबाबतची अधिकृत माहिती अजून दिली नाही.
बऱ्याच वर्षांपासून दोघांचं होत अफेअर
बऱ्याच वर्षांपासून दोघांचं अफेअर सुरु असल्याचं सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून म्हटलं जात होतं. दोघांचा डिअर कॉम्रेड या चित्रपटात त्यांच एकमेकांवर असणार प्रेम अभिनयातून दिसून आलं होत. आता त्या दोघांनी खरंच साखरपुडा केला का हे मात्र अजूनही समजलेलं नाही.

