सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या डॉली सिंहने तिच्या करिअरच्या सुरुवातीचा एक वाईट अनुभव शेअर केला आहे. वयाच्या १९ व्या वर्षी दिल्लीत एका प्रोड्युसरने तिला हॉटेलमध्ये बोलावून गाडीत तिच्यासोबत गैरवर्तन केले होते.
अनेक अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला वाईट अनुभव येत असतात. नंतर अनेकदा त्या मुलाखतीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलताना याबद्दलचा खुलासा करत असतात. अशाच एका अभिनेत्रीला अनुभव आला आणि तिने तो शेअर केला. आज याच अभिनेत्रीने सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोण आहे ही अभिनेत्री? -
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून डॉली सिंह आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंटरनेटच्या माध्यमातून केली होती. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर म्हणून ती लोकप्रिय झाली आणि नंतर तिने इंडस्ट्रीत कामाला सुरुवात केली. तिने १९ वर्षांची असताना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला असं सांगितलं आहे. तिचा अनुभव ऐकून आपल्या अंगावर काटा उभा राहील.
घटना कुठे घडली होती?
घटना दिल्लीमध्ये घडली होती. तेव्हा ती अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. डॉली सिंह दिल्लीत असताना तिला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला होता. ती सुरुवातीच्या काळात एका कास्टिंग डायरेक्टरला भेटली आणि नंतर तिला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. तिला यावेळी कळेना की हा कॉल तिच्या टॅलेन्टसाठी आहे की काहीतरी वेगळंच प्रकरण आहे.
तेव्हा तिला एका प्रोड्युसरला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होत. बैठक झाल्यानंतर सगळे गाडीत बसले आणि प्रोड्युसरने अचानक किस घेतला आणि नंतर तिच्या छातीजवळ हात नेला. दिग्दर्शकाच्या कृत्यामुळे डॉली घाबरली. तिला काय करावं हे समजलं नाही. त्यादिवशी तिने समोरच्याला मेट्रो स्टेशनजवळ सोडा असं सांगितलं आणि नंतर ती बचावली.


