Hollywood News : प्रसिद्ध अभिनेत्याची वयाच्या 37 व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या

| Published : May 27 2024, 02:27 PM IST

johny wactor died

सार

हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मित्रांसोबत फिरायला गेला असता त्याच्या सोबत घात झाला. अभिनेत्याची 37 व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हॉलिवूडमध्ये आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एंटरटेनमेंट डेस्क : काळ कोणावर कसा चालून येईल याचा काही नेम नाही. अशीच एक दुःखद घटना हॉलिवूड अभिनेत्या बाबत घडली आहे. काळीज पिळवटुन टाकणारी ही घटना असून अनेकांना यामुळे धक्का बसला आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी वेक्टर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजलीया असून अभिनेत्याची हत्या करून आरोपी फरार आहेत.

होय ही बातमी खरी असून स्वतः जॉनीच्या आईने या बातमीचा खुलासा केला आहे. अभिनेत्याने वयाच्या ३७ व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला असल्याने संपूर्ण हॉलीवूडमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत घटना शनिवारी पहाटे घडली आहे. जॉनी वेक्टर याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती जॉनी वेक्टर याच्या आईने दिली आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांवर आणि जॉनीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकी प्रकरण काय ?

काही मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता मित्रांसोबत फिरण्यासाठी शनिवारी मध्यरात्री 3 वाजता निघाला होता.घर बाहेर पडताच अभिनेत्याच्या एका मित्राचं लक्ष त्याच्या कारकडे गेलं.तेव्हा कार जवळ तीन अज्ञात व्यक्ती होते ते कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते.हे करत असताना चोरांना कोणताही विरोध केला गेला नाही. तरीही त्यांनी अभिनेत्यावर गोळ्या झाडल्या आणि हत्या करत फरार झाले आहेत.

याप्रकरणी अभिनेत्याच्या आईने सविस्तर खुलासा करत सांगितले की,जॉनीने चोरांना ओळखल्यानंतर त्याने कोणत्याही प्रकारचा विरोध त्यांना केला नव्हता.मात्र तरीही त्यांनी त्याची हत्या केली आणि पळून गेले. हि संपूर्ण घटना एवढ्या लवकर झाली की आम्हाला पोलिसांना आळवण्याचा अवकाश मिळाला नाही. मात्र त्या चोरांनी त्याच हत्या केलीच आणि फरार झाले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. पण अद्याप एकही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

चाहत्यांसह हॉलीवूड मध्ये व्यक्त होतेय हळहळ :

अभिनेता जॉनी वेक्टर याच्या निधनानंतर हॉलिवूड आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी अभिनेत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता जॉनी वेक्टर याने ‘सायबेरिया एंडस क्रिमिनल माइंड्स’, ‘आर्मी वाइव्स’, ‘द ओए’, ‘हॉलीवुड गर्ल’ आणि ‘द वेस्टवर्ल्ड’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या हत्येची चर्चा सुरु आहे…

आणखी वाचा :

Ratna Pathak : नसीरुद्दीन शाह यांच्याबद्दल रत्ना पाठक यांनी केला रोमांचक खुलासा, म्हणाल्या माझ्या पेक्षा जास्त या कमला देतात महत्व...

Anant-Radhika 2nd Pre Wedding : दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी पाहुण्यांची लगभग सुरू, सलमान खानही रवाना