- Home
- Entertainment
- 'क्योंकि सास भी...'च्या चक्क 7 कलाकारांनी घेतलाय जगाचा निरोप, चौघांना हृदयविकाराचा झटका तर एकाची आत्महत्या
'क्योंकि सास भी...'च्या चक्क 7 कलाकारांनी घेतलाय जगाचा निरोप, चौघांना हृदयविकाराचा झटका तर एकाची आत्महत्या
मुंबई - 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेने अनेक कलाकारांना घराघरात पोहोचवलं. लहान स्क्रीनवरील ही सर्वाधिक गाजलेली सिरिअल आहे. पण, यातील काही कलाकार आता हयात नाहीत हे फार कमी लोकांना माहित आहे. जाणून घ्या, त्यांची माहिती…

सुधा शिवपुरी
'क्योंकि सास...'मध्ये 'बा'ची भूमिका साकारणाऱ्या सुधा शिवपुरींनी प्रेक्षकांच्या मनात स्थान प्राप्त केलं होतं. त्यांनी शोमध्ये समजूतदार आणि सशक्त आजीची भूमिका केली होती, जी कुटुंबाला एकत्र ठेवत असे. शो संपल्यानंतर सात वर्षांनी, २०१५ मध्ये त्यांचं निधन झालं.
विकास सेठी
विकास सेठींनी तुलसी (स्मृति ईरानी)च्या नातवाची भूमिका केली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. दुर्दैवाने, ८ सप्टेंबर २०२४ रोजी, ४८ व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कमी वयात त्याने जगाला अलविदा केला.
अबीर गोस्वामी
अबीर गोस्वामींनी रणजीतची भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना ही घटना घडली होती. त्यामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती.
समीर शर्मा
समीर शर्मांनी तुषार मेहताची भूमिका केली होती. २०२० मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अकाली मृत्युमुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यांनी आत्महत्या का केली असावी, अशी बरेच दिवस चर्चा रंगली होती.
दिनेश ठाकुर
दिनेश ठाकुर यांनी गोवर्धन वीरानींची भूमिका केली होती. २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांची भूमिकाही बरीच गाजली होती. तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत होता.
नरेंद्र झा
नरेंद्र झा यांनी अजय अग्रवालची भूमिका साकारली होती. २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली. त्यांनी इतरही सिरिअल्स आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.
इंद्र कुमार
इंद्र कुमार यांनी मिहिर वीरानीची भूमिका केली होती. हा त्यांचा टीव्हीवरील पहिलाच शो होता. २०१७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. फार कमी वयात त्यांचा मृत्यू झाला.

