- Home
- Entertainment
- Kajol Maa Collection : काजोलच्या 'मां'ने शुक्रवारी, शनिवारी केली एवढ्या कोटींची कमाई, गल्ल्यात होतेय सुधारणा
Kajol Maa Collection : काजोलच्या 'मां'ने शुक्रवारी, शनिवारी केली एवढ्या कोटींची कमाई, गल्ल्यात होतेय सुधारणा
मुंबई - 'मां' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत हळूहळू वाढ होत आहे. दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये थोडी सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.

काजेलचा 'मां' हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आमिर खानच्या 'तारे जमीन पर' चित्रपटाची टक्कर होती, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता. 'मां' चित्रपट अक्षय कुमारच्या 'कंचना' चित्रपटासोबतही प्रदर्शित झाला. अजय देवगणच्या निर्मिती संस्थेत तयार झालेल्या 'मां' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे जाहीर झाले आहेत, ज्यात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
काजोलच्या चित्रपटाचे कलेक्शन
२७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या काजोलच्या 'मां' चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.६५ कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडेही जाहीर झाले आहेत. sacnilk.com नुसार, 'मां'ने दुसऱ्या दिवशी ५.६५ कोटींची कमाई केली. अशाप्रकारे, चित्रपटाने दोन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे १०.३० कोटींचा व्यवसाय केला आहे. रविवारच्या सुट्टीचा फायदा काजोलच्या चित्रपटाला होऊ शकतो आणि त्याची कमाई वाढू शकते, असे व्यापार विश्लेषकांचे मत आहे.
काजोलच्या 'मां' चित्रपटाबद्दल
'मां' चित्रपटाद्वारे काजोल जवळपास ३ वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतली. 'मां' हा अजय देवगणच्या 'शैतान' विश्वाचा एक भाग आहे. हा एक भयपट आहे ज्याची कथा थरारक आहे. चाळीस वर्षांपूर्वी, चंदरपूर गावात एका नवजात मुलीचा माँ कालीला बळी देण्यात आला होता, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. गावाच्या बाहेर असलेल्या एका शापित झाडावर राहणाऱ्या दैत्या नावाच्या राक्षसाला शांत करण्यासाठी हा बळी देण्यात आला होता. अंबिका (काजोल) आणि शुवणका (इंद्रनील सेनगुप्ता) हे या परंपरेने बांधलेल्या कुटुंबातील आहेत, ज्यांना प्रत्येक पिढीत त्यांच्या मुलींना या राक्षसाला अर्पण करण्याचा शाप आहे.
मात्र, ही परंपरा मोडीत काढत, हे जोडपे त्यांच्या मुलीसाठी गावातून पळून जाते. पण नंतर असे काही घडते की अंबिकाला तिच्या मुलीसह तिच्या गावात परतावे लागते. त्यानंतर एक भयानक खेळ सुरू होतो. हा चित्रपट विशाल फुरिया यांनी दिग्दर्शित केला असून जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्सने निर्मिती केली आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे ५५-६५ कोटी रुपये आहे.

