गौतमी पाटीलला होणार अटक, सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर येणार
Gautami Patil: पुण्यातील एका अपघातामुळे नृत्यांगना गौतमी पाटील चर्चेत आली आहे. तिच्या कारने एका रिक्षाला धडक दिली असून, आता जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमीला अटक करण्याची आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

गौतमी पाटीलला होणार अटक, सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर येणार
महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असते. तिच्या डान्सच्या कार्यक्रमांना लोक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात.
गौतमी कोणत्या कारणामुळे आली चर्चेत?
गौतमी पाटील एका नवीनच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला अटकेची मागणी करण्यात येत असून पोलिसांकडून एका सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली जात आहे. त्यामुळं आता गौतमी अटक होणार का, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे प्रकरण एका अपघाताशी निगडित आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एक अपघात झाला होता. हा अपघात एक कार आणि ऑटो रिक्षा यांच्यात झाला होता. या अपघातातील कार गौतमीची होती.
दुर्घटनेत रिक्षा चालकाचे झाले नुकसान
या झालेल्या दुर्घटनेत रिक्षा चालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रिक्षाचालक जखमी झाल्यानंतर तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केलं. या कारमध्ये अपघाताच्या वेळी गौतमी पाटील नसल्याची माहिती मिळाली आहे.
गौतमी पाटीलला अटक करण्याची का केली मागणी?
गौतमी पाटील हिला यावेळी अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. अपघात झाल्यानंतर गौतमीच्या गाडीचा चालक गायब झाला. रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटील हिला अटक करा अशी मागणी केली आहे.
आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवे आहे
रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांनी या झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज द्यावेत अशी मागणी केली आहे. त्यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये फुटेज द्यावे आणि रिक्षाचालकांची झालेली नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

