सार
मृण्मयी देशपांडेने छोटा पडदाच नव्हे, तर चित्रपट, नाटक आणि मालिका विश्व गाजावणारी अभिनेत्री म्हणून नाव लौकिक केलं आहे. ‘कुंकू’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे.
मृण्मयी देशपांडेने छोटा पडदाच नव्हे, तर चित्रपट, नाटक आणि मालिका विश्व गाजावणारी अभिनेत्री म्हणून नाव लौकिक केलं आहे. ‘कुंकू’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे. ‘कुंकू’ या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी जानकी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेनंतर तिचं खरं नाव विसरून लोक तिला जानकी म्हणूनच ओळखू लागले. त्याच जानकीचा आज 35 वा वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून मृण्मयीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
मोठी बहीण कायमच लहान बहिणीच्या पाठीशी उभी असते. असाच काहीस गौतमी आणि मृण्मयीमध्ये देखील पाहायला मिळत. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर कायम असतात. आज आपल्या लाडक्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस असल्याने गौतमीने खास व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. गौतमीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “Happy Birthday ताई ! माझ्या कायम पाठिशी उभी राहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू…आय लव्ह यू बाकी सगळं तुला माहितीच आहे.” या पोस्टबरोबर अभिनेत्रीने एक मजेशीर व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.
दोघींच्या कामाविषयी :
दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ यांच्या जीवनपटात झळकली होती. याशिवाय गौतमी सध्या ‘गालिब’ नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे.
मृण्मयीला कशी मिळाली पहिली संधी?
कॉलेजमध्ये असताना तिने काही नाटक स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता. त्यावेळी तिची एक मैत्रीण एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करत होती. या शॉर्ट फिल्मच्या असिस्टंट डिरेक्टरने मृण्मयीला पाहिलं. यानंतर त्याने तिला एका ऑडिशनसाठी यायला सांगितलं. त्यावेळी मृण्मयीने ऑडिशन दिली होती. यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी तिला ऑडिशनसाठी बोलावलं गेलं आणि तिची निवड एका बॉलिवूड चित्रपटासाठी झाली. हे ऐकल्यानंतर मृण्मयीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता