इम्रान हाश्मीला ऐश्वर्या रायवर केलेल्या विधानाचा पश्चाताप, म्हणाला- माफी मागायची आहे, पण का?

| Published : Jul 13 2024, 07:17 PM IST

Emraan Aishwarya

सार

बॉलिवूडमधील अभिनेता इम्रान हाश्मी सध्या ऐश्वर्या रायवरुन केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, इम्रानने केलेल्या विधानाचा आता त्याला पश्चाताप झाला असून ऐश्वर्याची माफी मागायची असल्याचे म्हणत आहे. यामागील नक्की कारण काय हे जाणून घेऊया...

Bollywood News : अभिनेता इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) बॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये काम केले आहे. अशातच इमरान हाश्मीची वेब सीरिज ‘शो टाइमचा’ (Show Time) दुसरा पार्ट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. सीरिजच्या प्रमोशनसाठी इमरान हाश्मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या येथे मुलाखत देत आहेत. याच दरम्यान, इमरान हाश्मीने अशा एका किस्स्याबद्दल सांगितले ज्यामध्ये त्याने ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai) प्लास्टिक म्हणून संबोधले होते. इमरान हाश्मीने याच मुद्द्यावरुन खुलेपणाने भाष्य केले आहे. इमरानने म्हटले की, ऐश्वर्या रायला प्लास्टिक बोलल्याने मला आता याबद्दल तिची माफी मागायची आहे.

इमरानला ऐश्वर्याची मागायची आहे माफी
द लल्लनटॉपसोबत संवाद साधताना इमरान हाश्मीला विचारण्यात आले की, ऐश्वर्या रायला प्लास्टिक म्हणून संबोधल्याने पश्चाताप होतोय का? यावर इमरान हाश्मीने उत्तर देत म्हटले की, हो मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. खरंतर, ऐश्वर्यासाठी माझ्या मनात फार मोठा आदर आहे. पण ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या माझ्या विधानावर मला वाईट वाटतेय. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवरुन युजर्स नाराज होतात. यामुळे माझ्या केलेल्या विधानामुळे ऐश्वर्याला वाईट वाटले असल्यास मी तिची मागू इच्छितो.

ऐश्वर्या रायला म्हटले होते प्लास्टिक
कॉफी विद करणच्या (Koffee With Karan) चौथ्या सीझनमधील एका एपिसोडमध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्या रायला प्लास्टिक म्हणून संबोधले होते. यानंतर इमरान हाशमी सोशल मीडयावर ट्रोल झाला होता. इमरान हाश्मीने म्हटले की, मला केवळ हँपर जिंकायचे होते म्हणून मी ऐश्वर्याबद्दल असे बोललो. दरम्यान, ऐश्वर्या रायने कधीच इमरान हाश्मीच्या विधानावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा : 

कतरिना कैफ आई होणार? अनंत-राधिकाच्या लग्नातील लूकवरुन नेटकऱ्यांनी उपस्थितीत केले प्रश्न (Watch Video)

Amitabh Bachchan यांचा डीपफेक व्हिडीओ तयार करणे पडले महागात, कोर्टाने फेटाळला आरोपीचा अंतरिम जामीन