- Home
- Entertainment
- Durga Puja 2025 : दुर्गा पूजेत जया बच्चन यांनी काजोलला मारली मिठी, मुंबईत रंगले बंगाली समागम!
Durga Puja 2025 : दुर्गा पूजेत जया बच्चन यांनी काजोलला मारली मिठी, मुंबईत रंगले बंगाली समागम!
Durga Puja 2025 : मुंबईत बंगाली समाजातर्फे मोठ्या थाटामाटात दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं. यात सामान्य लोकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेच सहभागी होतात. सोमवारी या पूजेला जया बच्चन, काजोल आणि राणी मुखर्जी यांनीही हजेरी लावली.

दुर्गा पूजेमध्ये जया बच्चन
बंगाली समाजाच्या दुर्गा पूजेला सोमवारी जया बच्चन यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यांनी काजोलची भेट घेतली आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघींनी मिळून फोटोग्राफर्सना पोजही दिल्या.
गप्पा मारताना जया बच्चन
दुर्गा पूजेत सहभागी झालेल्या जया बच्चन खूपच आनंदी दिसत होत्या. त्या बराच वेळ शर्बानी मुखर्जी आणि काजोलसोबत गप्पा मारताना दिसल्या.
आनंदी मूडमध्ये दिसल्या जया बच्चन
सहसा रागात दिसणाऱ्या जया बच्चन दुर्गा पूजा मंडपात खूपच आनंदी दिसत होत्या. यावेळी त्यांनी गोल्डन-ग्रीन रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसली होती. हातात मॅचिंग बॅगही होती.
सुंदर काजोल
दुर्गा पूजा मंडपात जया बच्चन आणि काजोल बऱ्याच वेळ एकमेकींशी बोलताना दिसल्या. यावेळी काजोल पिवळ्या-किरमिजी रंगाचा पदर असलेल्या पांढऱ्या-क्रीम रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.
लाल-गाजरी रंगाच्या साडीत राणी मुखर्जी
आई दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी राणी मुखर्जीही पोहोचली. यावेळी तिने सोनेरी वर्क असलेली लाल-गाजरी रंगाची साडी नेसली होती. हेवी नेकलेस आणि केसात गजरा माळून राणी सुंदर दिसत होती.
राणी मुखर्जीने दिल्या पोज
काजोलने अभिनेता वत्सल सेठच्या कुटुंबासोबत पोज दिल्या. तर, राणी मुखर्जीने तिचा चुलत भाऊ आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत फोटोग्राफर्सना पोज दिल्या.
काजोलची मस्ती
दुर्गा पूजा मंडपात काजोल वत्सल सेठच्या मुलासोबत मस्ती करतानाही दिसली. तिने त्याला उचलून घेतले आणि नंतर पोजही दिल्या.

