- Home
- Entertainment
- 'हा' चित्रपट कुटुंबासोबत पहाल तर होईल अवघडल्यासारखं, रोमँटिक सीन्स पाहून व्हाल रोमांचित
'हा' चित्रपट कुटुंबासोबत पहाल तर होईल अवघडल्यासारखं, रोमँटिक सीन्स पाहून व्हाल रोमांचित
गहराइयां: 'गहराइयां' हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला एक चित्रपट आहे, जो त्याच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत होता.हा चित्रपट आधुनिक नातेसंबंधांमधील गुंतागुंत, प्रेम आणि विश्वासघात यावर आधारित आहे.

'हा' चित्रपट कुटुंबासोबत पहाल तर होईल अवघडल्यासारखं, रोमँटिक सीन्स पाहून व्हाल रोमांचित
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसिरीज कायमच प्रसिद्ध होत असतात. आपण ते चित्रपट कुटुंबासोबत पाहू शकत नाही कारण त्यामध्ये बोल्डनेस मोठ्या प्रमाणावर असतो.
कुटुंबासोबत पाहताना नजर चुकवावी लागू शकते
या प्रकारच्या चित्रपटांमध्ये अश्लील सीन्स मोठ्या प्रमाणावर असतात, अशा प्रकारचे सीन्स असल्यामुळं प्रेक्षकांना अनेकदा नजर चुकवावी लागू शकते. २०२२ मध्ये असाच एक चित्रपट रिलीज झाला होता, आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.
या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती
हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. यामध्ये तीन व्यक्तिरेखा होत्या आणि सगळेजण त्याबद्दल बोलत होते. या सिनेमात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी भूमिका केल्या होत्या.
चित्रपटाचे नाव काय होते?
या चित्रपटाचे नाव 'गहराइयां' होते. 'गहराइयां' ही एक अशी कथा आहे, जी आधुनिक नातेसंबंधांमधली गुंतागुंत आणि मानवी भावनांच्या खोलीचा सुंदरपणे शोध घेते. आपण या चित्रपटाचा एकांतात आनंद घेऊ शकता.
नातेसंबंध, प्रेम आणि विश्वासघात दाखवण्यात आला
या चित्रपटामध्ये एकाचवेळी नातेसंबंध, प्रेम आणि विश्वासघात दाखवण्यात आला होता. या कथेत मुख्य भूमिका असलेली आलिशा खन्ना (दीपिका पदुकोण) ही एक योगा प्रशिक्षक आहे, जी तिच्या कारकिर्दीत आणि रिलेशन या दोन्ही गोष्टींवर स्थिरावलेली वाटते.
चित्रपटाची स्टोरी काय आहे?
आलिशाचा प्रियकर, करण (धैर्य करवा) हा एक अयशस्वी लेखक आहे आणि त्याच्यासोबतचं तिचं नातं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. एक दिवस, आलिशा तिची चुलत बहिण टिया (अनन्या पांडे)चा होणारा नवरा जैन (सिद्धांत चतुर्वेदी)ला भेटते आणि त्याचवेळी सिनेमाची कथा भावनिक वळण घेते.