सार
Dahi Handi 2024 : देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. माखनचोर म्हटल्या जाणाऱ्या बाळकृष्णाच्या बालपणींच्या आठवणींचा उजाळा देण्यासाठी यंदा दहीहंडी 27 ऑगस्टला आहे. दहीहंडीनिमित्त काही मराठमोळ्या गाण्यांवर ठेका धरत उत्सव साजरा करूया.
Dahi Handi 2024 Marathi Songs : दहीहंडीचा उत्सव मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात दिून येतो. यावेळी अनेक गोविंदापथके मोठ्या धाडसाने उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. दहीहंडीवेळी रचले जाणाऱ्या मानवी मनोऱ्यांचे दृष्य प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असते. याशिवाय ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये दहीहंडीनिमित्त गाणी लावून गोविंदा पथकांसह नागरिकांकडून गाण्यांवर ठेका धरतात.
दहीहंडीचे महत्व
भगवान कृष्ण आपल्या सवांगड्यान समवेत बालपणी इतर गोपाळ गोपिकांच्या घरी दही दूध लोणी अशाच पद्धतीने पेंद्यांचे थर रचून त्यावर चढून,हंडी फोडून, चोरून, गट्ट करीत असे आणि लाडिक बोलणी,खात असे. त्याची आठवण म्हणून ही दही हंडीची प्रथा चालू झाली. आज तो खेळ असला तरी मूळ तो परंपरा आणि संस्कृती शी निगडित आहे.
मुंबईत आणि ठाण्यात दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांचा उत्साह भरपुर असतो. तरुणांची अनेक पथके एकापाठोपाठ एक नऊ थर लावुन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो तसेच डीजेच्या तालावर सर्व तरुण मंडळी नाचताना दिसतात.
आणखी वाचा :
Dahi Handi 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास Messages पाठवून साजरा करा गोविंदा