‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनची घोषणा, महेश मांजरेकर नाही तर यंदा अभिनेता करणार सूत्रसंचालन

| Published : May 21 2024, 12:17 PM IST / Updated: May 21 2024, 07:33 PM IST

ritesh deshmukh bigg boss 5

सार

नुकतीच ‘मराठी बिग बॉस’च्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून, या पर्वात सूत्रसंचालन कोण करणार, हे देखील समोर आले आहे.नव्या सीझनचं होस्टिंग करणार 'हा' मराठमोळा. 

 

‘मराठी बिग बॉस’च्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून, या पर्वात सूत्रसंचालन कोण करणार, हे देखील समोर आले आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा पहिला टीझर शेअर करण्यात आला असून, यामध्ये महेश मांजरेकर नाही तर अभिनेता रितेश देशमुख यंदा बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. 

View post on Instagram
 

छोट्या पडद्यावर गाजणारा आणि कायम चर्चेत असणारा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखलं जातं. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली असून कलर्स मराठी वाहिनीने ‘बिग बॉस’मराठीच्या पाचव्या सीझनची अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे. फक्त यावेळी होस्ट म्हणून महेश मांजरेकरांच्या ऐवजी एका नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

रितेश देशमुख करणार सूत्रसंचालन :

‘बिग बॉस मराठी सीजन ५’च्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखला पाहून आता चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे. महेश मांजरेकर यांनी तब्येतीच्या कारणामुळे मागच्याचा पर्वात आपण आता कदाचित पुढच्या पर्वात दिसणार नाही. अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, काही काळापूर्वी त्यांनी आपल्याला विचारणा झाल्यास सूत्रसंचालन करण्याचा विचार नक्की करू, असे देखील म्हटले होते. मात्र आता त्यांच्या जागी रितेश देशमुखची वर्णी लागल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आजवरच्या चार ही सीझनमध्ये महेश मांजरेकर यांनी आपल्या कणखर आणि डॅशिंग पर्सनॅलिटीने स्पर्धकांची नेहमीच चांगली शाळा घेतली होती.

आणखी वाचा :

TMKOC च्या सेट वर असं काय घडलं ? जेठालाल वर एकाने फेकली खुर्ची

सलमान खान त्याची भाची अलिजेला हे काम कधीच करू देणार नाही,भर कार्यक्रमात केली जाहीर घोषणा