शेफाली जरीवाला यांचे निधन: शेफाली जरीवाला, सिद्धार्थ शुक्ला ते केके आणि राजू श्रीवास्तव, हृदयविकाराने किंवा कार्डिअॅक अरेस्टने प्राण गमावलेल्या सेलिब्रिटींची नावे जाणून घ्या.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फक्त शेफालीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना हृदयविकाराचा किंवा कार्डिअॅक अरेस्टचा सामना करावा लागला आहे. हृदयविकाराने किंवा कार्डिअॅक अरेस्टने प्राण गमावलेल्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया.
शेफाली जरीवाला (२०२५)
अभिनेत्री आणि 'बिग बॉस १३' फेम शेफाली जरीवाला हिचे २८ जून, २०२५ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. शेफाली १५ वर्षांची असल्यापासून मिर्गीच्या झटक्यांनी त्रस्त होती. दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होती. अचानक कार्डिअॅक अरेस्टने काही मिनिटांत तिचा जीव घेतला.
योगेश महाजन (२०२५)
पौराणिक मालिकांतील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता. अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने टेलिव्हिजन क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात आला.
विकास सेठी (२०२४)
२००० च्या दशकात झळकलेले लोकप्रिय अभिनेते. ८ सप्टेंबर २०२४ रोजी झोपेत असताना कार्डिअॅक अरेस्ट झाला आणि वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कविता चौधरी (२०२४)
‘उडान’ मालिकेतील सशक्त भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी अचानक हृदयविकाराने निधन.
ऋतुराज सिंह (२०२४)
टीव्ही मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये झळकलेले ऋतुराज २० फेब्रुवारी २०२४ रोजी कार्डिअॅक अरेस्टमुळे गेले. ते ५९ वर्षांचे होते.
सतीश कौशिक (२०२३)
हास्य भूमिकांसाठी ओळखले जाणारे नामवंत अभिनेते आणि दिग्दर्शक. ९ मार्च २०२३ रोजी ६६ व्या वर्षी हृदयविकाराने निधन.
केके (कृष्णकुमार कुन्नाथ) (२०२२)
भारतातील एक नामवंत गायक, ज्यांचे ३१ मे २०२२ रोजी कोलकात्यात लाईव्ह शो नंतर हृदयविकाराने निधन झाले. वय केवळ ५३ वर्ष.
राजू श्रीवास्तव (२०२२)
लोकप्रिय कॉमेडियन, ५८ व्या वर्षी वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मृत्यूने देशभरात हळहळ व्यक्त झाली.
प्रदीप पटवर्धन (२०२२)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते. ९ ऑगस्ट २०२२ रोजी ६४ व्या वर्षी हृदयविकारामुळे मृत्यू झाला.
मिथिलेश चतुर्वेदी (२०२२)
चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार. ३ ऑगस्ट २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
पुनीत राजकुमार (२०२१)
कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी वयाच्या ४६ व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टने निधन.
सिद्धार्थ शुक्ला (२०२१)
‘बिग बॉस १३’ चे विजेते, आणि लोकप्रिय अभिनेता. २ सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या केवळ ४० व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू.
चिरंजीवी सरजा (२०२०)
कन्नड अभिनेता, ७ जून २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने ३९ व्या वर्षी निधन.
वाढते हृदयविकाराचे प्रमाण : एक चिंतेचा विषय
शेफालीसह अनेक सेलिब्रिटींना हृदयविकाराचे झटके अतिशय तरुण वयात येत असल्याने ही बाब चिंताजनक आहे. झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली, तणाव, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे कार्डिअॅक अरेस्टसारख्या घटना वाढत आहेत.
डॉक्टरांच्या मते, कार्डिअॅक अरेस्ट हे हृदयविकारासारखेच असले तरी वेगळी स्थिती आहे. यामध्ये हृदय अचानकपणे धडकणं थांबवतं आणि काही सेकंदांत व्यक्ती बेशुद्ध होते. वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू निश्चित होतो.


