सार

Bigg Boss OTT 3 Winner : सना मकबूल आणि नॅजी यांच्यामध्ये ट्रॉफीसाठी तगडी टक्कर झाल्याचे दिसून आले. पण सनाने ट्रॉफीवर आपले नाव कोरले. खरंतर, बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच सना एक उत्तम स्पर्धक म्हणून खेळत होती.

Bigg Boss OTT 3 Winner : बिग बॉस ओटीटी-3 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यामध्ये सना मकबूलने (Sana Makbul) रॅपर नॅजीला  (Rapper Naezy) टक्कर देत विजय मिळवला आहे. याशिवाय रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूक, नॅजी आणि कृतिका मलिक अंतिम पाच फाइनलिस्ट होते. विजेती ठरलेल्या सना मकबूलला 25 लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.

सना आणि नॅजीमधील मैत्री
बिग बॉसच्या फिनालेवेळी सना आणि नॅजीने आमच्यामध्ये सखोल मैत्री असल्याचे दाखवून दिले. दोघांनी एकमेकांसोबत परफॉर्मेन्सही केला. घरातील सदस्यांनी नॅजीला सनावर विश्वास ठेवू नकोस असा सल्ला दिला होता. तरीही बिग बॉसच्या घरात सना आणि नॅजीमधील मैत्री घट्ट होती. सनाने बिग बॉसच्या घरात नेहमीच नॅजीला पाठिंबा देण्यासह त्याच्यासोबत उभी राहिली.

विजेत्याला 25 लाखांची रोख रक्कम
फिनालेसाठी स्पर्धेतून बाहेर पडलेल्या स्पर्धकांनीही उपस्थितीत लावली होती. यामध्ये शिवानी कुमारी आणि लवेश कटारियाच्या नावाचा समावेश आहे. एवढेच नव्हे श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावने त्यांचा आगामी सिनेमा ‘स्री-2’ च्या प्रमोशनसाठी फिनालेच्या वेळी आले होते. बिग बॉस ओटीटी-3 विजेत्याला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाले.

View post on Instagram
 

बिग बॉसच्या घरातील टॉप-3 स्पर्धक
बिग बॉस ओटीटी-3 फिनालेसाठी तीन स्पर्धक अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. यामध्ये सना मकबूल, नॅजी आणि रणवीर शौरी (Ranvir Shorey) यांचा समावेश होता. रणवीर शौरीने घराबाहेर पडल्यानंतर धमाकेदार परफॉर्मेन्सही केला. रणवीरने रॅपसोबत सर्वांचे मनोरंजनही केले. यानंतर रणवीर शौरी स्पर्धेतून बाहेर जात नॅजी आणि सना यांच्यामध्ये पुरस्कारासाठी टक्कर झाली.

कोण आहे सना मकबूल
मुंबईत राहणारी सना अभिनेत्री आणि मॉडेल आहे. वर्ष 2009 मध्ये सना MTV स्कूटी टीन दिवामध्ये झळकली होती. यानंतर म्युझिकल सीरिजमध्ये सना दिसली होती. याशिवाय सनाने काही टीव्ही शो आणि साउथ सिनेमांमध्येही काम केले आहे. 'इस प्यार को क्या नाम दूं?', 'अर्जुन विष', 'आदत से मजबूर', 'कितनी मोहब्बत है-2' मध्येही सनाने काम केले आहे. खरंतर, 'खतरो के खिलाडी-11' मुळे सना मकबूल लाइमलाइटमध्ये आली.

आणखी वाचा : 

Auron Mein Kahan Dum Tha Review : भावूक करणारी अजय-तब्बूची अनोखी लव्ह स्टोरी

BB Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आर्या आणि जान्हवीमध्ये तुफान राडा, VIDEO