सार

Bigg Boss Marathi Season 5 Updates : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन रंगत चालला आहे. घरातील पहिला सदस्य बाहेर पडल्यानंतर आता कॅप्टन्सीच्या पदासाठी पहिल्यांदाच टास्क देण्यात येणार आहे. यावेळी सदस्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 Updates : बिग बॉसच्या घरात निक्की तंबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर यांच्यामधील शाब्दिक चकमक सुरु असतानाच अन्य सदस्यांमध्येही वाद रंगू लागले आहेत. खरंतर जान्हवी आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडल्याचे दिसून आले. यामुळे जान्हवी दुखावली गेली असून याला कारणीभूत कोण याचेच उत्तर तिच्याकडून शोधले जात आहेत. दुसऱ्या बाजूला अन्य सदस्य आपल्या डोक्याने शो मध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पण आता बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी पदाचा टास्क देण्यात आला आहे. यावेळी कोण कॅप्टन होणार हे पाहणे उत्सुकतेचे आहेच. पण टास्क एक झलक कलर्स मराठीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर केली आहे. 

कॅप्टन्सी पदासाठी सदस्यांमध्ये धक्काबुक्की
बिग बॉसच्या घरात आठवड्याभरासाठीचा एक सदस्य कॅप्टन होणार आहे. यासाठी बिग बॉसने घरातील सदस्यांना टास्क देत त्याला कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन असे नाव दिले आहे. यामध्ये एका सीटसाठी सदस्यांमध्ये जोरदार खेळ रंगणार आहेच. पण कॅप्टन्सीच्या पदासाठी सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी अभिजित आणि अरबाजमध्ये वाद होताना दिसून येतायत. याशिवाय कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला टास्क दरम्यान होणारा त्रास बिग बॉसला ओरडून सांगतेय. एवढेच नव्हे टास्कवेळी अरबाज सदस्यांवर संतप्त झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

टास्कवेळी सूरज आणि वैभवमध्ये कडाक्याचे भांडण
कॅप्टन्सिच्या पदावेळी सूरज आणि वैभवमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. यामध्ये सूरजसाठी वैभवने वापरलेल्या शब्दांमुळे तो अत्याधिक संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. वाद अधिक चिघळू नये म्हणून सूरजला इरिना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत असल्याची क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : 
BB Marathi Elimination : पुरुषोत्तदादा पाटलांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला

BB Marathi : निक्की तंबोळीला मिळाली महाराष्ट्राच्या अपमानाची शिक्षा (VIDEO)