सार

कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी स्टारर ‘भुल भूलैया-3’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली आहे. रिपोर्ट्सनुसार, ट्रेलर येत्या 9 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सिनेमा यंदा दिवाळीत सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Trailer Release Date : कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमीर यांचा 'भूल भुलैया-3' सिनेमा प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. सिनेमाचा ट्रेलर 6 ऑक्टोबरला रिलीज होणार होता. पण निर्मात्यांनी अखेरच्या वेळेस रिलीजचा विचार बदलला. असे बोलले जात आहे की, अजय देवगण याचा आगामी सिनेमा 'सिंघम अगेन' च्या ट्रेलरमुळेच भूल भुलैया-3 चा ट्रेलर रिलीज केला नाही. दरम्यान, सिंघम अगेन सिनेमाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अशातच आता भूल भुलैया-3 सिनेमाच्या ट्रेलरची नवी रिलीज डेट समोर आली आहे.

कधी होणार ट्रेलर रिलीज?
कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया-3 सिनेमाच्या ट्रेलर संदर्भात एक ताजी माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचा ट्रेलर 9 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. याच्या ट्रेलरचा इवेंट मुंबईत नव्हे राजस्थानमधील जयपुरमध्ये पार पडणार आहे. सिनेमाचा ट्रेलर 3 मिनिटांपेक्षा अधिक कालावधीचा असू शकतो. दरम्यान, निर्मात्यांकडून अद्याप सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. खरंतर, भुल भुलैया-3 सिनेमाचा टीझर पाहूनच अनेकांच्या अंगावर काटा आला होता.

View post on Instagram
 

सिनेमागृहांमध्ये कधी रिलीज होणार सिनेमा?
दिग्दर्शक अनीज बज्मी यांचा भूल भुलैया-3 सिनेमा यंदाच्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाची टक्कर अजय देवगणच्या सिंघम अगेनसोबत होणार आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा भूल भुलैया-3 मध्ये रूह बाबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय विद्या बालन, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा, राजपाल यादव, राजेश शर्मा असे कलाकारही सिनेमात झळकणार आहेत. सिनेमाचे 150 रुपये कोटी बजेट असल्याचे बोलले जात आहे. याआधी वर्ष 2022 मध्ये आलेल्या भूल भुलैया-2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. 70 कोटी बजेट असणाऱ्या सिनेमाने 266.68 कोटी रुपयांची कमाई केली होती.

आणखी वाचा : 

सिंघम अगेनमधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्याला मिळाली सर्वात जास्त रक्कम

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मनोरंजनाचा धमाका, रिलीज होणार हे 7 Big Movies