- Home
- Entertainment
- Aryan Khan Education : शाहरुखचा मुलगा 27 व्या वर्षीच 80 कोटींचा मालक, आर्यनचं शिक्षण-संपत्ती किती?
Aryan Khan Education : शाहरुखचा मुलगा 27 व्या वर्षीच 80 कोटींचा मालक, आर्यनचं शिक्षण-संपत्ती किती?
Aryan Khan Education : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. २७ वर्षांच्या आर्यन खानची संपत्ती किती कोटी आहे? तो काय शिकला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला आर्यन खानबद्दल जाणून घेऊया.

दिग्दर्शक म्हणून शाहरुखच्या मुलाची एन्ट्री
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याची पहिली वेब सीरिज 'द बार्ड्स ऑफ बॉलिवूड' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. १५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सीरिजमध्ये ५० बॉलिवूड सेलिब्रिटींनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
आर्यनला साधारणपणे लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं. पण, त्याच्या 'द बार्ड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे. सीरिज स्ट्रीम होत असताना आर्यनचं शिक्षण, संपत्ती आणि कार कलेक्शनबद्दलच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
आर्यन खानचं शिक्षण
आर्यन खानने त्याचं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला. त्याने सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्समधून फिल्म अँड टेलिव्हिजन मेकिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
आर्यन खानची एकूण संपत्ती
आर्यन खानच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास, तो ८० कोटींचा मालक आहे. काही वर्षांपूर्वी त्याने दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये ३७ कोटी रुपयांची एक आलिशान मालमत्ता खरेदी केली होती. असं म्हटलं जातं की, त्याच्या आई-वडिलांनी करिअरच्या सुरुवातीला इथेच वास्तव्य केलं होतं.
एक यशस्वी व्यावसायिक
आर्यन खान दिग्दर्शकासोबतच एक व्यावसायिकही आहे. त्याने २०२२ मध्ये 'D'YAVOL' नावाचा लक्झरी लाइफस्टाइल ब्रँड सुरू केला. त्यानंतर, त्याने 'D'YAVOL X' नावाने स्ट्रीटवेअर आणि स्पिरिट्स लाइन सुरू केली, ज्यामध्ये प्रीमियम फॅशन आणि वोडका यांचा समावेश आहे.
महागड्या गाड्यांची आवड
आर्यन खानला त्याच्या वडिलांप्रमाणेच किंग साइज आयुष्य जगायला आवडतं. त्याला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे ऑडी A6, मर्सिडीज GLS 350d, मर्सिडीज GLE 43 AMG कूप आणि BMW 730LD सारख्या गाड्या आहेत. यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
बालकलाकार म्हणूनही केलं काम
आर्यन खानने २००१ मध्ये आलेल्या करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्याने आपल्या वडिलांसोबत 'द इनक्रेडिबल्स' (२००४), 'द लायन किंग' (२०१९) आणि 'मुफासा' (२०२४) च्या हिंदी आवृत्तीसाठी व्हॉईस आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.

