गायक झुबीन गर्ग यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. संगीतकार अनु मलिक यांनी त्यांना एक चांगला माणूस म्हटले आहे. तसेच, त्यांनी खुलासा केला आहे की आसामचा हा गायक अचानक कधीही, कुठेही बेशुद्ध व्हायचा.
Anu Malik's reaction on Zubeen Garg's Death: झुबीन गर्ग यांचे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी निधन झाले. या प्रतिभावान गायकाच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आता प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढली आहे. संगीतकाराने सांगितले की, ते खूप चांगले व्यक्ती होते, त्यांना अचानक बेशुद्धी येते हे आधीच कळले होते. अनु मलिक म्हणाले की, "तो खूप शांत आणि प्रेमळ आत्मा होता. आता यापेक्षा जास्त कोणी कोणाबद्दल काय बोलू शकतं?"
कशी झाली अनु मलिक आणि झुबीन गर्ग यांची ओळख
अनु मलिक यांनी पुढे सांगितले की, "मी त्यांना पहिल्यांदा आसाममधील एका व्यक्तीमार्फत भेटलो. मी त्यांना 'फिजा'मध्ये गाणं शिकवलं आणि आमचं चांगलं जमायचं. ते आपल्या बहिणीबद्दल खूप भावूक होते, एका अपघातात त्यांनी तिला गमावलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी आसामी, बंगाली, मणिपुरी, बोडो, इतकंच नाही तर मराठी गाणीही गायली आहेत. ते मल्याळी गाणीही गायचे. त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रेक्षक वेडे व्हायचे. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मन विषण्ण झालं आहे."
अचानक बेशुद्ध व्हायचे झुबीन गर्ग
अनु मलिक यांचा दावा आहे की, झुबीन यांना काही काळापूर्वी आरोग्याच्या काही समस्या होत्या. "ते मला नेहमी सांगायचे की त्यांना अचानक बेशुद्धी येते. मी त्यांना म्हणायचो, 'जा आणि स्वतःची तपासणी करून घे.' मग अनेक वर्षे त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांनी फोनही केला नाही, निघून गेले. डोंगरांचा, त्यांच्या आसामचा हा आवाज खूप मधुर होता, त्यांचा आवाज आता ऐकू येणार नाही. त्यांची गाणी नेहमीच वातावरणात गुंजत राहतील."
झुबीन गर्ग यांना आवडायचं या चित्रपटाचं संगीत
अनु यांनी पुढे सांगितले, "त्यांना 'बॉर्डर'चं संगीत खूप आवडायचं, ते नेहमी यासाठी माझी प्रशंसा करायचे. मी त्यांना वारंवार मुंबईत राहण्यासाठी सांगायचो, त्यांना आणखी काम मिळेल, पण त्यांना कधीच आपलं घर सोडायचं नव्हतं. एक दिवस त्यांनी मला म्हटलं, 'अनु सर, मला मुंबईत परत यायचं नाही. तुम्ही बोलवलं तर येईन, आणि गाणं गाऊन लगेच निघून जाईन, परत आसामला, कारण मला सामाजिक कामांमध्ये जास्त रस आहे.' ते पूरग्रस्तांना मदत करायला जायचे, ते एक चॅरिटी संस्था चालवत होते. मी त्यांच्या खूप जवळ होतो, ते मला त्यांच्या कामांबद्दल सांगत राहायचे." आम्हाला त्यांची उणीव भासेल.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, झुबीन यांचा मृत्यू लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात पोहताना झाला.


