सार

अक्षय कुमारने आपला नवा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘भूत बंगला’ चे पोस्टर शेअर केले आहे. सिनेमा वर्ष 2025 मध्ये रिलीज होणार असून पोस्टर शेअर केले आहे.

Akshay Kumar New Movie : बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार 9 सप्टेंरला आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षयने नवा हॉरर कॉमेडी सिनेमा 'भूत बंगला'ची घोषणा केली आहे. याशिवाय अक्षयने इंस्टाग्रामवर सिनेमाचे पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.

अक्षयने शेअर केले मोशन पोस्टर
अक्षय कुमारने भूत बंगला सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अक्षयने हातात दूधाची वाटी घेतली असून दूध पिताना दिसून येत आहे. याशिवाय खांद्यावर मांजर बसलेली दिसते. अक्षयने पोस्टर शेअर करत लिहिले की, "वर्षानुवर्षे तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त दाखवत असलेल्या प्रेमासाठी आभार. यंदाच्या वर्षाचे सेलिब्रेशन भूत बंगला सिनेमाच्या फर्स्ट लूकसोबत मी 14 वर्षांनंतर प्रियदर्शनसोबत पुन्हा जोडण्यासाठी खूप उत्सुक आहे." अशा आशयाची एक पोस्ट अक्षयने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

View post on Instagram
 

युजर्सने दिल्या प्रतिक्रियाट
अक्षयने सिनेमाचे पोस्टर शेअर केल्यानंतर युजर्सने प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने म्हटले, ‘प्रियदर्शनसोबतची जादुई जोडी पुन्हा परत येत आहे. दोघे 14 वर्षांनंतर 7व्या एकत्रित काम करत आहे’. दुसऱ्याने म्हटले की, ‘लीजेंड्री युनियन’. याशिवाय काहींनी अक्षयला नव्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सिनेमाबद्दलची अधिक माहिती समोर आलेली नाही. सिनेमाची कथा काळ्या जादूवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. सिनेमात अक्षयसोबत तीन अभिनेत्री झळकण्याची शक्यता आहे. यासाठी कियारा अडवाणी, किर्ती सुरेश आणि आलिया भट्टच्या नावाची चर्चा आहे.

आणखी वाचा : 

Bigg Boss 18 च्या सेटवरुन सलमान खानची पहिली झलक समोर

GOAT Twitter Review : ब्लॉकबस्टर सिनेमा, थलापतिच्या चाहत्यांकडून भरभरून कौतुक