अहान शेट्टीचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जिया शंकरसोबत जोडलं जात आहे. आता अहानच्या प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया देत यामागील सत्य सांगितलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव 'बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक आणि मराठी अभिनेत्री जिया शंकरसोबत जोडलं जात आहे. आता अहान शेट्टीने यामागील सत्य सांगितलं आहे.

अहान आणि जियाच्या डेटिंगमागे काय आहे सत्य?

अहानच्या प्रवक्त्याने या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, 'डेटिंगच्या या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. अहान सध्या कोणालाही डेट करत नाहीये, तो पूर्णपणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याच्याकडे 'बॉर्डर 2' सह अनेक प्रोजेक्ट्स आहेत.' अनेक ऑनलाइन पोस्टमध्ये ते दोघे केवळ डेटिंगच करत नसून लग्नाचा विचार करत असल्याचे संकेत दिल्यानंतर हे स्पष्टीकरण आले आहे. अहानच्या टीमने या अफवा फेटाळून लावल्या आहेत, पण दोन्ही कलाकारांपैकी कोणीही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही.

अहान शेट्टी-जिया शंकर वर्कफ्रंट

अहान शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने 2021 मध्ये 'तडप' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच 'बॉर्डर 2' मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, जिया मराठी चित्रपट 'वेड' आणि 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये काम केल्यानंतर अनेक डिजिटल प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अहानने साधारणपणे आपलं खासगी आयुष्य चर्चेपासून दूर ठेवलं आहे, विशेषतः मॉडेल-डिझायनर तानिया श्रॉफसोबतच्या त्याच्या दीर्घकाळच्या नात्याचा शेवट झाल्यानंतर. दोघे जवळपास 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. तथापि, त्यांनी त्यांचं ब्रेकअप खासगी ठेवलं आणि दोघांपैकी कोणीही त्यामागील कारण सांगितलं नाही. सध्या अहान पूर्णपणे त्याच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तर जिया शंकरबद्दल बोलायचं झाल्यास, तिचं सर्वात चर्चेत असलेलं मागचं नातं अभिनेता पारस अरोरासोबत होतं.