हिरामंडी वेबसीरिजमधील अदिती राव हैदरीच्या अभिनयाने प्रेक्षक झाले घायाळ, आपण व्हिडीओ पाहिलात का?

| Published : May 14 2024, 10:11 AM IST / Updated: May 14 2024, 10:12 AM IST

Aditi Rao Hydari

सार

हिरामंडी वेबसिरीजमधील अदिती राव हैदरीच्या भूमिकेने प्रेक्षकांना घायाळ केले असून तिने केलेल्या गजगामिनी वॉकमुळे चर्चा वाढली आहे. 

संजय लीला भन्साळी यांचा हिरामंडी ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली आहे. या वेबसिरीजवर टीका सर्वच स्तरातून करण्यात आली होती. सर्वत्र या वेबसिरींजची कौतुक मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. हिरामंडी द डायमंड बाजार या वेबसिरीजमध्ये अदिती राव हैदरीने प्रमुख भूमिका केली असून तिने केलेल्या रॅम्प वॉकचे सर्वच ठिकाणावरून कौतुक केले जात आहे. 

View post on Instagram
 

अदिती राव हैदरीने केला गजगामिनी वॉक - 
गाजगामिनी म्हणजे हत्तीसारखी चाल चालणारा व्यक्ती असा होत असून त्या प्रकारचा वॉक गाण्यामध्ये अदिती राव हैदरीने केलेला दिसून आला आहे. या आधी माधुरी दीक्षितने अशा प्रकारचा वॉक केला असून या गाण्यामध्ये अदिती राव हैदरीने केलेल्या वॉकचे सर्वच स्तरांमधून कौतुक केले जात आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर पसंदी मिळत असून संजय लीला भन्साळी यांनी त्यासाठी कष्ट घेतले आहेत. 

कोण कोण आहे या वेबसिरीजमध्ये - 
संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या वेबसिरीजमध्ये स्टारकास्ट खूप मोठी आहे. यामध्ये अदिती राव हैदरी सोबतच मनीषा कोईराला, ऋचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, ताहा शाह बचोल, रजत कौल, शेखर सुमन, अध्ययन सुमन, फरदीन खान आणि इंद्रेश मलिक हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी या वेबसिरीजनंतर याचा दुसरा भाग येणार असल्याची माहिती दिली आहे. 
आणखी वाचा - 
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, कर्करोगामुळे लोकसभा निवडणूक प्रचारापासून होते दूर
राज्यात नवीन कोविड सबवेरियंट 'FLiRT' च्या आढळल्या 91 केसेस