मी बिकिनी कपडे घालून फोटो टाकते आणि लोक... अभिनेत्री रुचिरा जाधव स्पष्टच बोलली
Ruchira Jadhav: अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर बिकिनीतील फोटो आणि मंदिरातील फोटो शेअर करत असते. यावरून ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.

मी बिकिनी कपडे घालून फोटो टाकते आणि लोक... अभिनेत्री रुचिरा जाधव स्पष्टच बोलली
सध्याच्या काळात इंडस्ट्रीमधील सर्वजण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचं दिसून येत असतं. अभिनेत्री इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ टाकून माहिती शेअर करत असतात. बिकिनीमधील फोटो शेअर केल्यानंतर अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
रुचिरा जाधव काय म्हणाली?
रुचिरा जाधव म्हणाली की, मी कृष्णाच्या मंदिरात पण जाते. मग समुद्रावरचे स्विम सुट किंवा बिकिनी मधील म्हणू हवं तर... ते सगळे फोटो जर मला सोशल मीडियावर टाकावेसे वाटले तर मी ते टाकत असते. मग याबद्दल लोक का त्यांचं एकत्रिकरण करतात.
दोन्ही बाजू कशा सांभाळायच्या मला माहित
या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना! माझ्या इस्कॉन मधल्या मंदिराच्या फोटो खाली जर ते फोटो असतील तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की हीच बाकीचं ही प्रोफाइल पहा... ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मीच आहे. मला माझ्या दोन्ही बाजू कशा सांभाळायचा या माहित आहेत, असं रुचिरा म्हटली आहे.
कुठे काय घालायचं हे मला कळतं
कुठे काय घालायचं हे मला कळतं. मी मंदिरात साडी किंवा ड्रेस घालते. किंबहुना जशी असेल तशी जाते. समजा कधी मी शूट वरून लवकर फ्री झाले तर मी तोंडावर स्कार्फ गुंडाळून तिथे जाते. मंदिरात आपण मेकअप वगैरे करून जात नाही.
मंदिरात गेल्यावर देवाबद्दलच्या भावना महत्वाच्या असतात
शूटवरून सुटल्यावर जर मला मंदिरात जावं वाटलं तर मी व्यवस्थित कपडे घालून जाते. देवाजवळ जाताना त्याच्याबद्दलच्या आपल्या भावना महत्वाच्या असतात. त्यामुळे बाहेर जाताना कधी काय घालायचं आणि कधी काय नाही ते मला कळत.
रुचिरा जाधवचं काम काय सुरु आहे?
रुचिरा जाधव ही स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून खरी ओळख मिळाली होती. तिने गुरुनाथच्या गर्लफ्रेंडचे काम केले होते.

