1300 Cr ची संपत्ती आणि एअरलाइन्सचा मालक आहे हा साउथ अभिनेता
साउथ सिनेमातील सुपरस्टार राम चरण 39 वर्षांचा झाला आहे. अभिनेत्याचा जन्म साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार चिरंजीवी यांच्या घरी वर्ष 1985 रोजी झाला होता.
राम चरणने वर्ष 2007 मध्ये दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा सिनेमा 'चिरुथा' मधून साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्याने आपल्या करियरमध्ये 16 सिनेमांमध्ये काम केले आहे.
राम चरणच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राम चरण 1300 कोटी रुपयांच्य संपत्तीचा मालक आहे.
राम चरण आलिशान आयुष्य जगतो. हैदराबाद येथील जुबली हिल्सवर अभिनेत्याचा आलिशान बंगला असून त्याची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबईत एक पेंट हाउसही आहे.
राम चरण हैदराबाद येथील एअरलाइन्स ट्रु जेटचा मालकही आहे. यासाठी अभिनेत्याने 127 कोटी रुपये खर्च केले आहेत.
राम चरणला बालपणापासूनच घोडोस्वारी फार आवडते. यामुळेच राम चरणने पोलो टीम खरेदी करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, पोलो टीमसाठी 20 कोटी रुपये गुंतवले आहेत.
राम चरणचे प्रोडक्शन हाउसही आहे. याचे नाव 'कोन्निडेला प्रोडक्शन कंपनी' असे आहे. याची सुरूवात अभिनेत्याने वर्ष 2016 मध्ये केली होती.
राम चरणकडे कोट्यावधी रुपयांच्या महागड्या गाड्याही आहेत. यामध्ये 7 कोटी रुपयांची रॉल्स रॉयल फेंटम, 3 कोटी रुपयांची एस्टन मार्टिन V8 विंटेज कार आहे.
राम चरणला महागड्या घड्याळांची फार आवड आहे. त्याच्याकडे 30 महागडी घड्याळे आहेत. यापैकी एका घड्याळाची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे.