पुण्यातील चंदननगर येथे एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चोरीच्या आरोपावरून रूम पार्टनरकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि बदनामीला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रूम पार्टनरला जबाबदार धरले आहे.

सध्याच्या काळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना चंदननगर येथून समोर आली आहे. १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यावेळी ती राहत असलेल्या रुमपार्टनरकडून होत असलेल्या त्रास आणि बदनामीमुळे तीन हा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमकं काय झालं? 

पायल किशोर राजगुरू असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ती पुण्यात नर्सिंगचा कोर्स करत होती आणि विठ्ठलनगर येथील अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये आपल्या रूम पार्टनरसोबत राहत होती. तिने ९ मार्च रोजी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला रूम पार्टनर जबाबदार असल्याचा उल्लेख चिट्ठीमध्ये केला आहे.

कपाटातून पैसे गेले होते चोरीला?

 पायलच्या रूममध्ये राहणाऱ्या सबुरी काळे, शिवानी आजबले आणि दीपाली यांच्या कपाटातून पैसे, पर्स आणि मोबाईल चोरीला गेले होते. हा मोबाईल पायलनेच घेतल्याचा आरोप करत या तरुणींनी तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. या तिघी तिला ब्लॅकमेल करत होत्या आणि बदनामीमुळे तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आलं आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत.