पुण्यातील कामशेतजवळ फिरायला गेलेल्या एका कुटुंबाचे पुणे ग्रामीण पोलिसांनीच अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ड्रग्स ठेवल्याचा बनाव रचून ५ लाखांची मागणी करण्यात आली, मात्र मुलाने स्मार्ट वॉचद्वारे नातेवाईकांना कळवल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

पुणे: पोलिसांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळं त्यांनी जनतेचं रक्षण करावं आणि वेळ आली तर गुन्हेगारांशी दोन हात करावेत अशी अपेक्षा असते. पण पुण्यामध्ये पोलिसांनीच अपहरण केल्याची एक घटना घडली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळं याचा उलगडा झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कामशेतजवळ घडली घटना 

पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळ हि घटना घडली. पुण्यातील विमाननगर भागात राहणारे 28 वर्षांचे भूषित शर्मा आणि त्यांची पत्नी आणि कुटुंब फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत मित्र मोहम्मद आजमी त्यांची पत्नी आणि कुटुंब 5 जुलैला फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची कार अडवण्यात आली. त्यांच्या कारमध्ये ड्रग्स आहेत म्हणून त्यांचं अपहरण करण्यात आलं.

मुलानी नातेवाईकांना दिली माहिती 

कारमध्ये ड्रग्स आहेत म्हणून पोलिसांनी या सर्वांच अपहरण केलं. त्यांच्याकडं ५ लाख रुपये मागण्यात आले. यावेळी मुलाने तत्परता दाखवून स्मार्ट वॉचच्या मदतीने नातेवाईकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यावर पुणे ग्रामीणच्या ६ पोलिसांनी हा प्रकार केल्याचं लक्षात आलं.