मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. "त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला पाहिजे," असे या क्लिपमध्ये म्हटले असून, ही क्लिप बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे राज्यात आणि विशेषतः बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना धमकी दिलेली एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या कॉल रेकॉर्डिंगमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालीय. "त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला पाहिजे," अशी रेकॉर्डिंग व्हायरल झाली. विलास घुले हत्या प्रकरणातील हि कॉल रेकॉर्डिंग असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बीडमधील वातावरण बिघडलं
बीडमधील वातावरण आता पूर्णपणे बिघडलं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या विरोधात आरोप झाल्यानंतर एकमेकांवरआरोप प्रत्यारोप होत आहेत. बजरंगे सोनवणे यांचे समर्थक बाळासाहेब पाथरकर यांनी रमेश घुलेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर एका व्यक्तीने पाथरकर यांना कॉल केला होता.
काय धमकी दिली?
यावेळी समोरच्या व्यक्तीने पाथरकर यांच्याशी बोलताना मनोज जरांगे यांना धमकी दिली आहे. त्या चौथी पास व्यक्तीला गोळी मारायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. हि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. बीडमधील केज तालुक्यातील विलास घुले याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर बीडमधील वातावरण ढवळून निघालं आहे.


