सार

रशियाच्या हवाई दलाचे एक मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघात झालेल्या विमानात 65 युक्रेनी कैदी असल्याची माहिती समोर आली आहे.

Russian Plane Crash : रशियाच्या हवाई दलाचे मालवाहू विमान IL-76 चा बुधवारी (24 जानेवारी) अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. विमानात 65 युक्रेनी कैदी (Ukrainian Prisoners) आणि सहा क्रू मेंबर्स होते. विमान अपघातात किती जणांचा मृत्यू झालाय याची ठोस माहिती समोर आलेली नाही.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने घटनेबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, विमानात युद्धादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या 65 युक्रेनी सैनिकांचा समावेश होता. या कैद्यांना बेल्गोरोड (Belgorod) क्षेत्रात नेण्यात येत असतानाच विमानाचा अपघात झाला.

विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर 
सोशल मीडियावर विमान अपघाताचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतेय की, बेल्गोरोड क्षेत्रात विमानाचा अपघात झाल्यानंतर त्याला भीषण आग लागली गेली. पण व्हिडीओ नक्की रशियाच्या विमान अपघाताचाच आहे का याची पुष्टी झालेली नाही.

दुर्घनटास्थळी तपास आणि आपत्कालीन मदत सुरू
RIA-Novosti वृत्तसंस्थेने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने माहिती देत म्हटले की, सकाळी 11 वाजता (मॉस्को येथील वेळ 08008GMT) एक IL-76 विमानाचा बेल्गोरोड येथे अपघात झाला. सध्या दुर्घटनास्थळी तपास आणि आपत्कालीन मदत सुरू आहे. 

आणखी वाचा : 

BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

तुम्ही मुलांना कारच्या खिडकीजवळ बसवता का? नक्की पाहा अंगावर काटा आणणरा VIDEO

Canada : विमान उड्डाणाआधीच प्रवाशाने केबिनचा दरवाजा उघडत मारली उडी, व्यक्ती जखमी