सार
तीन घटनेतील महिलांनी कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्यांना दम देखील देण्यात आला, मात्र आरोपीने त्यांचे चेहरे मॉर्फ करून न्यूड फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक बाबा समोर आली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?
Mumbai : मुंबई गेल्या ७२ तासात तीन महिलांना कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला गेला. यामध्ये त्यांचे फोटो मॉर्फ करून ते न्यूड फोटो त्यांच्या पालकांना, मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यातून तिघंही महिलांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली आहे.
सदर प्रकरण असे की, या तिघंही महिलांनी वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज घेतले असल्याचे भासवत. यासाठी त्यांना धमकीचे फोन देखील आले होते. या तिघंही घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत. अंधेरी, जोगेश्वरी आणि मालाड येथील या महिला असून त्यांचे फोटो व्हायरल झाले हे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली आहे.
जोगेश्वरी येथील प्रकरण :
जोगेश्वरी येथील पीएस केवट (वय २७) याना ८ एप्रिल रोजी फोन आला यामध्ये समोरच्याने त्यांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली. कँडी अपवरून घेतलेले ३७०० रुपयांचे कर्ज फेडण्यास सांगितले. मी कधीही कर्ज घेतलेले नाही तरी मला एका तासात वेगवेगळ्या नंबर वरून २४ फोन आले. जेव्हा नकार दिला तेव्हा मॉर्फ केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्यात आले. हे प्रकरण ओशिवारा पोलीस हताळत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हायरल केलेल्या फोन नंबरचा मागोवा सायबर पोलीस घेत आहेत.
मालाड मधील प्रकरण :
मालाड येथील रहिवासी के एस यादव (वय २६) यांनी सांगितलं की, महिलांना देखील शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली आहे.मला फोन आल्यावर मी भावाला फोनवर बोलायला सांगितले त्यानंतर त्यांनी भावाला देखील शिवीगाळ केला आणि माझे फोटो मॉर्फ करून व्हायरल केले.
अंधेरी मधील प्रकरण :
अंधेरी येथील महिलेने सांगितले की, मला ६ एप्रिल रोजी एक लिंक आली त्यावर क्लिक केले, माझ्या संमती शिवाय खात्यात १८०० रुपये जमा झाले. मला प्रकरण नेमके समजले नाही. नंतर फोन आला की, तुम्ही घेतलेले १८०० रुपयांचे कर्ज परतफेड करा, मी विरोध केला तर माझे न्यूड फोटो नातेवाईकांना आणि पालकांना पाठवण्यात आले.
आणखी वाचा :
आईच निघाली वैरी, मित्र बलात्कार करतोय माहिती असूनही शांत बसली