सार

पुण्याजवळी पिंपरी-चिंचवड येथे सायबर शाखेकडून बनावट ट्रेडिंग रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Crime News : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथे सायबर शाखेकडून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. खरंतर, बनावट ट्रेडिंग अ‍ॅपच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात होती. यासंदर्भातील माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडो यांनी दिली आहे.

आरोपींकडून सात लाख रुपयांची रोकड जप्त
पोलिसांनी आरोपींकडून सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय सात मोबाइल फोन, पैसे मोजण्याची मशीन, आठ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, 12 चेकबुक आणि पंजाब नॅशनल बँकेचे एक पासबुक जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील जुनैद मुक्तार कुरेशी, सलमान मंसूर शेख, अब्दुल अजीज अंसारी, आकिफ अनवर आरिफ अनवर खान आणि तोफीक गफ्फार अशी आरोपींची नावे आहेत. या पाचही जणांनी जवळजवळ 120 बँक खात्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची नागरिकांची फसवणूक केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण
तपासात असे समोर आले की, पाचही आरोपींकडे कोट्यावधी रुपये असण्यासह 120 बँक खाती आहेत. त्यांचे परदेशातही संबंध होते. नागरिकांकडून आलेले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये टाकण्यासह त्याबद्दलचा व्यवहार करणाऱ्यांकडे दिले जायचे. जे हाँगकाँगमध्ये आहेत असेही डोईफोडे यांनी सांगितले. (Pune madhil fake share trading racketcha khulasa)

आरोपी बेरोजगार असून शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना ते टार्गेट करायचे. यानंतर गुंतवणूकदारांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासह उत्तम भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगायचे. काही दिवसानंतर गुंतवणूकदारांना आरोपी व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजला काहीच उत्तर देत नव्हते.

दरम्यान, नागरिकांनी अधिकृत गुंतवणूकीच्या अ‍ॅपमधून गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहता येईल.

आणखी वाचा : 

पुणे विद्यापीठात लव्ह जिहादच्या आरोपाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! पैश्यांसाठी मैत्रिणीचे अपहरण केले, खून करून जाळून पुरले

पिंपरी-चिंचवड येथील स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड, तीन महिलांची सुटका