आईच निघाली वैरी, मित्र मुलीवर बलात्कार करतोय माहिती असूनही शांत बसली

| Published : Apr 12 2024, 09:13 AM IST / Updated: Apr 13 2024, 07:46 AM IST

rape 1.jp

सार

गाझियाबाद येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 10 वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडून बलात्कार करण्यात येत होता. तरीही आई शांत बसली आणि उलट मुलीलाच त्रास देत होती. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Crime News : गाझियाबाद (Ghaziabad) येथील एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एक आई आपल्याच मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करत होती. याशिवाय 10 वर्षीय मुलीवर आईच्याच मित्राने अनेकदा बलात्कार केला होता. 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लोणी बॉर्डरजवळी परिसरात राहणाऱ्या एका 10 वर्षीय मुलीने 20 जानेवारीला घरातून पळ काढत दिल्ली गाठले. दिल्ली पोलिसांनी मुलीला फिरताना पाहिले असता तिची विचारपूस केली. यानंतर मुलीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आल्यानंतर तिला बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले. मुलीच्या वैद्यकीय चाचणीत कळले की, तिच्यावर बलात्कार झाला आहे.

नक्की काय घडले?
पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले की, तिच्या घरी एक तरुण तिचे शोषण करायचा. याशिवाय आरोपी तिच्या 13 वर्षीय भावासोबतही चुकीच्या पद्धतीने वागायचा. यामुळेच तिच्या भावानेही घर सोडले होते. खरंतर, आईला सर्वकाही गोष्टी माहिती होत्या. तरीही ती शांत असल्याचे मुलीने म्हटले. 

मुलीला वेश्याव्यवसायात ढकलत होती आई
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीची आई वेश्याव्यवसाय करू लागली होती. यामुळे मुलीनेही वेश्याव्यवसाय करावा असे तिला वाटत होती. गाझियाबादमधील लोणी बॉर्डर पोलीस (Loni Border police)  स्थानकाच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले की, मुलीची आई आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिली घटनेची अधिक माहिती
सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर शर्मा यांनी घटनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. शर्मा यांनी म्हटले की, पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाची ओखळ पटली आहे. आरोपी राजू दिल्लीतील रहिवाशी आहे. 20 जानेवारीला मुलगी बेपत्ता झाल्यानंतरही आईने तिची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केली नव्हती. पीडित मुलीने म्हटले की, तिची आई आणि राजू आपला गुन्हा लपवण्यासाठी माझ्यावर अत्याचार करायचे. 

दिल्ली पोलिसांनी जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. पण 9 एप्रिलला लोणी बॉर्डर पोलीस स्थानकात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी राजूला ऐवढी घाबरत होती की, त्याने सुरूवातीला तिला म्हटले होते तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आई आणि राजूला अटक केली आहे.

आणखी वाचा : 

धक्कादायक! पैश्यांसाठी मैत्रिणीचे अपहरण केले, खून करून जाळून पुरले

माणूस आहे की राक्षस ? पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले २०० हुन अधिक तुकडे; नंतर मृतदेह मित्राच्या मदतीने फेकला नदीत

हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी केली महिलेची हत्या...