Amravati Police Officer Murder : अमरावतीत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) ची चारचाकीने उडवून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी काही तासांत दोन आरोपींना अटक केली असून, पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.
वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने काकू आणि चुलत भावाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वेजापूरमधील एका आश्रमातील महिला कीर्तनकार यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून वेगाने आरोपीचा शोध घेतला जात आहे.
मे महिन्यामध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या कॅब ड्रायव्हरचा जामीन कोर्टाकडून नाकारण्यात आला आहे. खंरतर, आरोपीने पीडित मुलीला घराच्या दिशेने सोडण्याएवजी एका निर्जन स्थळी घेऊन जात तिच्यासोबत अश्लील कृत करण्याचा प्रयत्न केला.
Beed Crime : बीडमधील नामांकित शिक्षण संस्थेमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करण्यासह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Nagpur News : नागपुरात हॉटेलच्या आडून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी छापा टाकून दोघींना सोडवले आणि दोघा आरोपींना अटक केली.
पुण्यातील तळवडे परिसरात बुधवारी (२५ जून) पहाटे प्रेमसंबंधातून एका महिला आणि पुरुषाचा दगडाने ठेचून खून केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली. या दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अहिल्यानगरमधील एका शाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका आठवीमधील मुलाने दहावीतील मुलाचा खून केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Delhi Murder : दिल्लीच्या ज्योती नगरमध्ये एका तरुणीला तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने पाचव्या मजल्यावरून ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला. नेहा नावाच्या या तरुणीला तौफिक नावाचा तरुण लग्नासाठी त्रास देत होता आणि तिच्या नकारामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
नाशिकमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याच मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, नवं घर दाखवण्याच्या बहाण्याने मुलीचे आयुष्य संपवल्याचे सांगितले जात आहे.
Crime news