मे महिन्यामध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या कॅब ड्रायव्हरचा जामीन कोर्टाकडून नाकारण्यात आला आहे. खंरतर, आरोपीने पीडित मुलीला घराच्या दिशेने सोडण्याएवजी एका निर्जन स्थळी घेऊन जात तिच्यासोबत अश्लील कृत करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : अलीकडल्या काळात मुलींवर अत्याच्यार किंवा त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मे महिन्यात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विक्रोळी येथील कॅब अॅग्रीगेटर चालक श्रेयांश पांडे (वय २३) याचा जामीन अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने बुधवारी फेटाळला. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते, त्यामुळे ‘खोट्या गुंतवणुकीच्या प्रकरणात अडकलो’ हा आरोपीचा दावा स्वीकारण्याजोगा नाही.
नक्की काय घडले?
१३ मे रोजी पीडित मुलीने तिच्या वडिलांना फोन करून सांगितले की तिचा वर्ग संपला असून ती घरी जाण्यासाठी कॅब हवी आहे. वडिलांनी तत्काळ टॅक्सी अॅपद्वारे तिच्यासाठी एक राईड बुक केली. काही वेळात, मुलीला वेगळ्या नंबर प्लेटची कॅब आली आणि ती त्यात चढली. तिने तिच्या वडिलांना मेसेज करून याची माहिती दिली.थोड्या वेळात वडिलांनी अॅपवर कॅबचे स्थान पाहिले असता लक्षात आले की ती ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे, जो नेमून दिलेला मार्ग नव्हता.
पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, तिने ड्रायव्हरला अनेकदा गाडी थांबवण्यास सांगितले, मात्र त्याने दुर्लक्ष केले. गाडीत मोठ्याने संगीत लावले गेले होते आणि ड्रायव्हरने दोन वेळा चुकीचे वळण घेतले. तिने स्पष्ट केले की, पांडेने तिच्या फोनवरून वडिलांशी बोलण्याचा बहाणा करत तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसंच रिअरव्ह्यू मिररमधून सतत तिच्याकडे बघत राहिला, सिगारेट ऑफर केली, तसेच तिच्या अंगावर चुकीच्या हेतूने हात ठेवण्याचा प्रयत्न केला.
मुलीने दाखवली सतर्कता
घाबरलेली मुलगी फोनवरून वडिलांशी संपर्कात होती. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच वडिलांनी अॅपवरील सेफ्टी बटण दाबले आणि पोलिसांना १०० नंबरवर फोन केला. त्यानंतर संभाषण ऐकून ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मुलगी बाहेर पडून सुरक्षित राहिली.
न्यायालयाचा निर्णय
पीडित मुलगी, तिचे वडील आणि सरकारी वकील गीता शर्मा यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला. शर्मा यांनी नमूद केले की, आरोपीला जामिनावर सोडल्यास तो इतर प्रवाशांशीही असेच वागू शकतो आणि खटल्यापूर्वी मूळ राज्यात पळून जाऊ शकतो. न्यायालयाने प्रथमदर्शनी आरोपीवर गंभीर आरोप असल्याचे मान्य करत तपास अद्याप सुरू असल्याने जामीन नाकारला.
मुंबईत उबर ड्रायव्हरने मार्ग बदलला, दोन जण गाडीत घुसले
28 वर्षांची महिला पायलट गुरुवारी रात्री 11.15 च्या सुमारास दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून एकटीच घाटकोपरच्या दिशेने निघाली होती. तिच्या पतीने तिच्यासाठी उबर कॅब बुक केली होती. सुमारे 25 मिनिटांच्या प्रवासानंतर अचानक कॅब चालकाने रस्ता बदलला आणि त्याने दोन अनोळखी पुरुषांना गाडीत घेतलं. त्या दोघांपैकी एकाने मागच्या सीटवर महिलेच्या शेजारी येऊन बसताच तिला अश्लीलरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली.
आरडाओरड, धमकी आणि पोलीस तपासणीने वाचले प्राण
महिलेने तात्काळ विरोध करत आरडाओरड केली. तिने आरोपीला फटकारले असता त्याने तिला थेट धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकारात उबर ड्रायव्हर मूकदर्शक बनून सर्व पाहत होता. कोणतीही मदत किंवा हस्तक्षेप न करता! घटनेदरम्यान काही अंतरावर पुढे पोलीस तपासणी सुरू असल्याचं लक्षात येताच, ते दोघं आरोपी घाबरले आणि कॅबमधून उतरून पसार झाले.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


