तब्बल 46 वर्षानंतर 14 जुलैलाच का उघडण्यात आले जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार? घ्या जाणून

चार धामांपैकी एक जगन्नाथ मंदिराचे निर्माण 12 व्या शतकात झाले होते. या मंदिरात एक रत्न भांडार असून त्यामध्ये तीन देवता म्हणजेच भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्रा यांचे दागिने ठेवण्यात आले आहेत. हा रत्न भंडार तब्बल 46 वर्षांनंतर उघडण्यात आला आहे.

Jagannath Temple Ratna Bhandar : ओडिशामधील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरातील प्रतिष्ठित खजिना रत्न भंडार 14 जुलैला उघडण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मौल्यवान दागिने आणि अन्य वस्तूंची यादी तयार करण्यासाठी रत्न भंडार तब्बल 46 वर्षांनी उघडण्यात आला आहे. याआधी रत्न भंडार वर्ष 1978 मध्ये उघडण्यात आला होता. जाणून घेऊया रत्न भंडारमध्ये नक्की काय आहे आणि 14 जुलैलाच का उघडण्यात आला अशा काही गोष्टींबद्दल सविस्तर...

तिन्ही देवतांचे मौल्यवान दागिने
चार धामांपैकी एक असणाऱ्या जगन्नाथ मंदिराची निर्मिती 12व्या शतकात झाली होती. या मंदिरात एक रत्न भंडार आहे. असे म्हटले जाते की, मंदिरातील रत्न भंडारामध्ये तिन्ही देवता म्हणजेच भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्राचे दागिने ठेवण्यात आले आहेत. काही राजा आणि भक्तांनी भगवानांना दागिने अर्पण केले होते. हेच सर्व दागिने रत्न भंडारमध्ये ठेवले जात होते. या रत्न भंडारमधील सर्व दागिने मौल्यवान असल्याचे सांगितले जात आहे. आजवर दागिन्यांचे कधीच मूल्यांकनही करण्यात आले नव्हे. हे ऐतिहासिक भंडार जगन्नाथ मंदिराच्या जगमोहनच्या उत्तर किनाऱ्यावर आहे.

भंडारमध्ये किती खजिना?
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, रत्न भंडारमध्ये तीन कक्ष आहेत. 25X40 स्क्वेअर फूट विस्तारलेल्या कक्षमध्ये 50 किलो 600 ग्रॅम सोने आणि 134 किलो 50 ग्रॅम चांदी आहे. याचा कधीच वापर करण्यात आलेला नाही. सध्या कक्षात तीन किलो 480 ग्रॅम सोने आणि 30 किलो 350 ग्रॅम चांदी आहे. दैनिक अनुष्ठानासाठी याच गोष्टींचा वापर केला जातो.

कधीकधी उघडण्यात आलाय रत्न भंडार?
मंदिरातील रत्न भंडार वर्ष 1905, वर्ष 1926 आणि 1978 मध्ये उघडण्यात आला आहे. या रत्न भंडारमधील अत्यंत मौल्यवान वस्तूंची लिस्टही तयार करण्यात आली होती. रत्न भंडार शेवटचा 14 जुलै 1985 रोजी उघडण्यात आला होता. त्यावेळी रत्न भंडारची डागडुजी केल्यानंतर तो बंद करण्यात आला होता. यानंतर रत्न भंडार कधीच उघडला नाही. याशिवाय रत्न भंडारच्या चाव्या गायब झाल्या होत्या.

कशा सापडल्या चाव्या?
भंडारच्या चाव्या हरवल्याचे अशावेळी समोर आले होते जेव्हा सरकारने मंदिराच्या संरचनेच्या भौतिक तपासाचा प्रयत्न केला होता. 4 एप्रिल 2018 मध्ये असे सांगण्यात आले की, रत्न भंडारच्या चाव्या हरवल्या आहेत. यावरुन गदारोळ निर्माण झाल्यानंतर नवीन पटनायक यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी असे आदेश दिले होते. यानंतर वर्ष 2018 मध्ये आयोगाने 324 पानांचा रिपोर्ट तयार केला होता.

रिपोर्ट्सच्या काही दिवसानंतर पुरीमधील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना गुप्तपणे एक लिफाफा मिळाला. यावर लिहिले होती की, आंतरिक रत्न भंडारच्या खोट्या चाव्या. यावरुन दीर्घकाळ सुरु असलेला वाद आणखी वाढला गेला. या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी न्यायालयीन आयोगाचे गठन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रत्न भंडाराचा मुद्दा उचलून धरला होता.

20 मे 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करत होते. पुरीमध्ये जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरातील रत्न भंडारचा उल्लेख केला होता. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले होते की, जगन्नाथ मंदिर सुरक्षित नाही. मंदिराच्या रत्न भंडारच्या चाव्या गेल्या सहा वर्षांपासून गायब आहेत.

आता का उघडण्यात आला रत्न भंडार?
वर्ष 1978 नंतर मंदिराकडे किती संपत्ती आहे याचा काहीही अंदाज नाही. 12 व्या शतकात निर्माण झालेल्या जगन्नाथ मंदिराला चार धामांपैकी एक मानले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मंदिरातील रत्न भंडार उघडण्याचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. भाजापाने म्हटले होते की, ओडिसामध्ये आमचे सरकार आल्यास रत्न भंडार खुले केले जाईल. दरम्यान, याआधी वर्ष 2011 मध्ये तिरुवनंतरपुरममधील पद्मनाभ स्वामी मंदिरातील खजिना उघडल्यानंतर त्यामध्ये 1.32 लाख कोटी रुपयांचा खजिना मिळाला होता.

सापांकडून रत्न भंडारची सुरक्षितता केल्याची मान्यता
जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराची सापांकडून सुरक्षितता केली जात असल्याचे वेळोवेळी सांगितले जायचे. याशिवाय रत्न भंडारमधून साप फुत्कारत असल्याचा आवाज येतो असेही मानले जात होते. यामुळेच रत्न भांडार खुले करण्याआधी दोन सर्पमित्रांनाही बोलावण्यात आले होते. याशिवाय डॉक्टरांचे एक पथकही रत्न भंडारच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

आणखी वाचा : 

भगवान जगन्नाथ यांचे डोळे एवढे मोठे का आहेत? खास आहे कारण

Jagannath Rath Yatra 2024 : प्रत्येक 12 वर्षानंतर का बदलली जाते मुर्ती? जाणून घ्या खास कारण

Share this article