भगवान जगन्नाथ यांच्या डोळ्यांकडे पाहून कोणताही व्यक्ती मोहित होऊ शकतो.
भगवान जगन्नाथ यांच्या मोठ्या डोळ्यांमागील कारण म्हणजे ज्ञान, करुणा आणि दयेचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते.
भगवान जगन्नाथ यांचे डोळे मोठे असण्यामागील कथा अनोखी आहे. याबद्दलच जाणून घेऊया...
माता रोहिणी द्वारिकावासियांना कृष्णाच्या रासलीलाबद्दल कथा सांगत होती.
माताने श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्राला दरवाज्यावर उभे राहून कथा ऐकण्याचा आदेश दिला होता.
कृष्णाची कथा एकून सर्व द्वारकावास मंत्रमुग्ध झाले होते. पण सुभद्रा अत्यंत उदास झाली होती.
भाऊ कृष्ण आणि बलराम यांनी बहिणीची नाराजी पाहून तिच्या डाव्या-उजव्या बाजूला उभे राहिले.
कथा ऐकल्यानंतर तिन्ही भावंडे एवढे भावूक झाले की, त्यांचे डोळे रुंद झाले.
डोळे मोठे झाल्याचे पाहून नारद मुनींनी श्री कृष्णाला प्रार्थना करत म्हटले की, सुभद्रा आणि बलरामला हेच रुप द्यावे.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.