सार
Jagannath Rath Yatra 2024 : हिंदू धर्म शास्राममध्ये पुरी येथे आयोजित केल्या जाणाऱ्या विश्व विख्यात भगवान जगन्नाथ रथ यात्रेला विशेष महत्व आहे. या रथ यात्रेत प्रत्येक समुदायातील व्यक्ती मोठ्या भक्तीभावाने-श्रद्धेने सहभागी होतात.
Jagannath Rath Yatra 2024 : प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात ओडिसा येथील पुरी येथे भगवान जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन केले जाते. या रथ यात्रेवेळी अनेक नियमांचे पालन केले जाते. या रथ यात्रेला मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. असे म्हटले जाते की, रथ यात्रेवेळी रथ ओढला अथवा त्याला स्पर्श केल्याने आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. यंदा रथ यात्रा 7 जुलै 2024 रोजी काढली जाणार आहे. ही रथ यात्रा 9 दिवसांनी म्हणजेच 16 जुलैला पूर्ण होणार आहे. जाणून घेऊया भगवान जगन्नथ रथ यात्रेसंबंधिक काही महत्वाच्या आणि अनोख्या गोष्टींबद्दल सविस्तर...
कधी सुरु होते रथ यात्रा?
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वितीयेला भगवान जगन्नाथ रथ यात्रा काढली जाते. ही रथ यात्रा पाहण्यासाठी जगभरातून ओडिसातील पुरी येथे दाखल होतात. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा आपली मावशी गुंडिचाला भेटण्यासाठी जात असल्याने या रथ यात्रेला विशेष महत्व आहे. असे मानले जाते की, रथ यात्रेत सहभागी होणारा व्यक्ती क्रोध, लोभ अशा गोष्टींपासून मुक्त होतो. आयुष्यात सुख येत त्याला मोक्षाची प्राप्ती होते.
12 वर्षानंतर बदलली जाते मुर्ती
जगन्नाथ रथ यात्रेसंदर्भात काही हैराण करणारी तथ्येही आहेत. यापैकीच एक म्हणजे, प्रत्येक 12 वर्षानंतर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची मुर्ती बदलली जाते. या अनुष्ठानला 'नवकलेवर' असे म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की, नव्या शरिराचे धारण करणे. जाणकरांनुसार, तिन्ही मुर्ती लाकडापासून तयार केल्या जातात. बदलत्या ऋतूनुसार, लाकडामध्ये संभाव्य बदल होत असल्याने मुर्ती बदलल्या जातात.
अत्यंत गुप्तपणे केले जाते नवकलेवर अनुष्ठान
प्रत्येक 12 वर्षानंतरच्या कालांतराने मुर्ती बदलणे ते निर्माण करण्याची प्रक्रिया अत्यंत गुप्त ठेवली जाते. दरम्यान, भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि बलभद्र यांची मुर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून तयार केली जाते. झाडांची निवड स्वत: मंदिराती मुख्य महंतांकडून केली जाते. यामागील पहिली अट अशी की, हे झाड शंभर वर्ष जुने असावे. याशिवाय झाड पूर्णपणे पवित्र स्थळाच्या ठिकाणी उगवलेले असावे. मुर्ती तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत गुप्त असावी. यानंतर मुर्ती पूर्ण होते तेव्हा मुर्ती बदलताना संपूर्ण शहरातील वीज बंद केली जाते. पुरोहितांद्वारे मंत्रोच्चारणाने मुर्ती बदलली जाते.
आणखी वाचा :