Marathi

उन्हाळ्यात त्वचेला येईल ग्लो, घरच्याघरी तयार करा हे 5 Face Pack

Marathi

त्वचेला ग्लो येण्यासाठी फेस पॅक

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा टॅनिंग होण्याची समस्या खूप उद्भवली जाते. अशातच चेहरा डल दिसतो. यावेळी चेहऱ्याचे सौंदर्य आणि ग्लो कायम टिकून राहण्यासाठी पुढील काही फेस पॅक तयार करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

बेसन आणि हळदीचा फेस पॅक

बेसन व हळदीचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळ होण्यास मदत होते. यासाठी चिमूटभर हळद बेसनाच्या पीठात मिक्स करुन त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 10 मिनिटे लावा.

Image credits: pinterest
Marathi

दही आणि मधाचा फेस पॅक

दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते. यामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्स दूर होतात. मधामुळे त्वचा मऊसर होते. दही व मधाचा फेस पॅक लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. 

Image credits: social media
Marathi

ओट्स आणि केळ्याचा फेस पॅक

ओट्स नैसर्गिक स्क्रब प्रमाणे काम करतात. याशिवाय केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. या फेस पॅकसाठी पिकलेल्या केळ्याचा वापर करा. 

Image credits: freepik
Marathi

काकडी आणि एलोवेराचा फेस पॅक

काकडीच्या रसामुळे त्वचेला थंडावा मिळतो. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. एलोवेरा जेल त्वचेला हाइड्रेट ठेवते. याचा फेस पॅक उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला लावू शकता.

Image credits: social media
Marathi

संत्र्याच्या सालीचा फेस पॅक

संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. सर्वप्रथम सुकलेल्या संत्र्याच्या सालची पावडर तयार करुन त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. 

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

दीर्घकाळ टिकून राहिल Aloe Vera Gel, वाचा DIY हॅक्स

महाशिवरात्रीला जलाभिषेक करताना या 5 नियमांचे करा पालन

Mahashivratri 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास भक्तीमय संदेश

महाशिवरात्रीत ह्या रेसिपीने बनवा भांग पेडा, खाणारे होतील मदहोश