सार

सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे .

Viral Video : पाकिस्तानातील (Pakistan) एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. खरंतर कंडोमच्या आकाराचे फुगे सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा विजय लक्षात राहण्यासाठी समर्थकांनी उडवल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ 9 फेब्रुवारीचा असल्याचे सांगितले जात आहे. 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 
पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका (Pakistan Elections 2024) पार पडत आहेत. अशातच पाकिस्तानातील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या समर्थकांनी निवडणुकीत विजय झाल्याच्या आनंदात फुगे उडवले. पण कंडोमचा फुग्यांप्रमाणे वापर केलाय का? असा सवाल काही नेटकऱ्यांकडून उपस्थितीत केला जात आहे.

 खरंतर, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कंडोमच्या आकाराचे फुगे एका राजकीय पक्षाच्या समर्थकांकडून उडवले जात असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय फुग्यांखाली पक्षाच्या झेंड्यामधील रंगांचे झेंडे बांधल्याचेही दिसून येत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.


पाकिस्तानातील काही जागांवर सार्वत्रिक निवडणूक परत होणार?
पाकिस्तानात तीन दिवसांपासून सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. अशातच पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पुन्हा काही जागांवर निवडणूक घेणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानात निवडणूक आयोगाने (Pakistan Election Commission) मतदानाची सामग्री हिसकावून घेणे आणि त्याचे नुकसान केल्याच्या तक्रारींवर तपास केल्यानंतर देशभरात काही मतदान केंद्रांवर पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश जारी केले आहेत.

पाकिस्तानात नवाज शरीफ यांचे पुन्हा सरकार येण्याची शक्यता
पाकिस्तानात युतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. शनिवारी (10 फेब्रुवारीला) पाकिस्तानातील सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या युतीचे सरकार स्थापन करण्याच्या आग्रहाचे समर्थन केले.

आणखी वाचा : 

Pakistan Election : पाकिस्तानातील निवडणूकीआधी बलूचिस्तान येथे बॉम्बस्फोट, 20 हून अधिक जणांचा मृत्यू

अमेरिका चंद्र मोहिमेसाठी सज्ज, 14 फेब्रुवारीला लाँच होणार मिशन

अयोध्येनंतर UAE मधील भव्य हिंदू मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन, जाणून घ्या खासियत