सार

अलाबामा (US state Alabama) येथे नायट्रोजन गॅसचा वापर करून कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. शिक्षेची ही पद्धत असामान्य व क्रूर असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता.

अमेरिकेतील अलाबामा (US state Alabama) राज्यामध्ये नायट्रोजन गॅसचा वापर करून आरोपी केनेथ स्मिथला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची ही पद्धत असामान्य आणि क्रूर असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता. याविरोधात येथील सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळली.  नायट्रोजन गॅसचा वापर करून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे.

नायट्रोजन गॅसने मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची पहिलीच वेळ

अमेरिकेतील अलबामा येथे प्रथमच नायट्रोजन गॅसचा वापर करून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. ही अतिशय क्रूर व असामान्य प्रक्रिया असल्याचा युक्तिवाद वकिलांना न्यायालयामध्ये केला होता. कोणालाही अशा प्रकारे मृत्यूदंडाची शिक्षा देऊ नये. अमेरिकेच्या घटनेमध्येही या प्रक्रियेवर बंदी असल्याचे वकिलांनी सांगितले. दरम्यान  केनेथ स्मिथ (वय 58 वर्षे) या आरोपीला गुरुवारी रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी अलाबामा तुरुंगामध्ये मृत घोषित करण्यात आले. या आरोपीच्या चेहऱ्यावर मास्कद्वारे नायट्रोजन गॅस सोडण्यात आला. त्यामुळे श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि यामध्ये केनेथचा मृत्यू झाला.

न्यायालयाने फेटाळली याचिका

अलाबामामध्ये नायट्रोजन गॅसचा वापर करून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यावर बंदी घालण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण न्यायालयाने रात्री 8 वाजण्यापूर्वी ही याचिका फेटाळली आणि त्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यानंतर कैदी केनेथला रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

आणखी वाचा :

Shocking! हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या नादात आरोपीकडून लागली संपूर्ण इमारतीला आग, 76 जणांचा मृत्यू

UAE मधील हे नियम माहितीयेत का? कायदे मोडणाऱ्याला मिळते कठोर शिक्षा

Watch Video: भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना शिकवला धडा, सुरक्षितरित्या हायजॅक झालेल्या जहाजाची केली सुटका