अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका महिलेचं नशीब अचानक फळफळलं. नवऱ्याने तिला गिफ्ट म्हणून लॉटरीचं तिकीट दिलं होतं, ज्यावर तिला तब्बल ५ लाख ७७ हजार ७७७ डॉलर्स (सुमारे ५ कोटी रुपये) चा जॅकपॉट लागला.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका महिलेचं नशीब एका रात्रीत बदललं. नवऱ्याने तिला लॉटरीचं तिकीट गिफ्ट केलं होतं. या तिकिटावर तिला ५ लाख ७७ हजार ७७७ डॉलर्स (सुमारे ५ कोटी रुपये) चा जॅकपॉट लागला. ही महिला व्हर्जिनियाच्या बेडफोर्ड काउंटीमध्ये राहते. व्हर्जिनिया लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नवऱ्याने फॉरेस्ट, व्हर्जिनिया येथील वॉटरलिक रोडवर असलेल्या 'क्विक-ई फूड्स' (Quik-E Foods) स्टोअरमधून 'गोल्ड ७ एस' (Gold 7s) चे दोन स्क्रॅच-ऑफ तिकीट विकत घेतले होते.

घरी आल्यावर नवऱ्याने ती दोन्ही तिकीटं टेबलावर ठेवली आणि बायकोला सांगितलं की हे तिच्यासाठी गिफ्ट आहे.

बायकोने जेव्हा ते तिकीट स्क्रॅच केलं, तेव्हा तिला सुखद धक्काच बसला. त्यातील एका तिकिटावर तिला ५ लाख ७७ हजार ७७७ डॉलर्सचं पहिलं बक्षीस लागलं होतं. नवऱ्याने दिलेलं हे साधंसं गिफ्ट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं.

या महिलेने व्हर्जिनिया लॉटरीच्या अधिकाऱ्यांसोबत आपला आनंद शेअर केला. नवऱ्याने दिलेल्या या अनपेक्षित गिफ्टमुळे आपल्याला एवढी मोठी रक्कम मिळेल, याचा तिने विचारही केला नव्हता.

या पैशांचं काय करणार, असं विचारल्यावर तिने सांगितलं की तिला प्रवासाची आवड आहे. त्यामुळे यातील काही रक्कम ती जग फिरण्यासाठी आणि नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी खर्च करणार आहे.

व्हर्जिनियातील या जोडप्यासाठी एका साध्या दुकानातून केलेली खरेदी अर्ध्या दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचा जॅकपॉट घेऊन आली.