MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Robot Trainer Jobs : कपड्यांच्या घड्या घाला आणि महिना ८५ हजार कमवा! चीनमधली ही भन्नाट नोकरी पाहिलीत का?

Robot Trainer Jobs : कपड्यांच्या घड्या घाला आणि महिना ८५ हजार कमवा! चीनमधली ही भन्नाट नोकरी पाहिलीत का?

चीनमध्ये सध्या एक भन्नाट नोकरी ट्रेंड होतेय. इथे रोबोट्सना घरकाम शिकवण्यासाठी माणसांना चक्क ५७ हजार ते ८५ हजार रुपये (४,००० ते ६,००० युआन) महिना पगार दिला जातोय. भविष्यात रोबोट्सकडून घरकाम करून घेण्यासाठी ही तयारी सुरू आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 17 2026, 04:32 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
कपड्यांच्या घड्या घालून महिना ८५ हजार कमवणारे कामगार
Image Credit : x

कपड्यांच्या घड्या घालून महिना ८५ हजार कमवणारे कामगार

कपड्यांच्या घड्या घालण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंतची रोजची घरची कामं रोबोट्सना शिकवण्यासाठी चीनमध्ये एक भन्नाट नोकरी तयार झाली आहे. यासाठी माणसांना महिन्याला तब्बल ८५,००० रुपयांपर्यंत पगार दिला जातोय. भविष्यात माणसांऐवजी रोबोट्सनी स्वतःहून घरकाम करावं, हा यामागचा उद्देश आहे. यासाठी लागणारा सुरुवातीचा ट्रेनिंग डेटा तयार करण्याचं काम सध्या चीनमधले कामगार करत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
कामाचं स्वरूप आणि 'एम्बॉडेड एआय' (Embodied AI)
Image Credit : x

कामाचं स्वरूप आणि 'एम्बॉडेड एआय' (Embodied AI)

रोबोट्ससाठी डेटा गोळा करण्याच्या या तंत्रज्ञानाला 'एम्बॉडेड एआय' (Embodied AI) असं म्हणतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सनी खऱ्या जगात माणसांसारखं वस्तू हाताळायला शिकावं, हा यामागचा मुख्य हेतू आहे. ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणारे कामगार त्यांच्या हातांवर आणि शरीरावर हालचाली टिपणारे मोशन-कॅप्चर (Motion-capture) सेन्सर्स लावतात, तसंच बोटांमध्ये चिप्स घालतात.

कॉम्प्युटर स्क्रीनवर मिळणाऱ्या सूचनांनुसार ते कपमध्ये पाणी घेणं, बाटलीचं झाकण उघडणं, फरशी झाडणं, टेबल पुसणं आणि कपड्यांच्या घड्या घालणं अशी कामं करून दाखवतात. कामगारांच्या या बारीक शारीरिक हालचाली सेन्सर्सद्वारे डिजिटल डेटा म्हणून रेकॉर्ड केल्या जातात आणि रोबोट बनवणाऱ्या कंपन्यांना ट्रेनिंग माहिती म्हणून दिल्या जातात.

Related Articles

Related image1
Norway Oil Rig Job : वर्षाला सव्वा कोटी पगार, 250 दिवस सुट्टी; तरीही नोकरी करायला कुणी तयार नाही, कारण काय?
Related image2
World Best Cities : जगातलं नंबर 1 शहर कोणतं माहितीये? पाहा टॉप 7 बेस्ट सिटीजची लिस्ट
34
तगडा पगार, पण काम प्रचंड थकवणारं!
Image Credit : x

तगडा पगार, पण काम प्रचंड थकवणारं!

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या (SCMP) रिपोर्टनुसार, या रोबोट ट्रेनर्सना महिन्याला ४,००० ते ६,००० युआन (सुमारे ५७,००० ते ८५,००० रुपये) पगार मिळतो. पगार तगडा असला तरी, दिवसभर एकच काम शेकडो वेळा करावं लागत असल्याने कामगार प्रचंड थकून जातात.

बीजिंगमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय लिऊ युन यांची ऑटोमोबाईल क्षेत्रातली नोकरी गेली. वयामुळे दुसरी नोकरी मिळेना, म्हणून त्यांनी एका ट्रेनिंग सेंटरमध्ये ही नोकरी धरली. "रोबोटला ट्रेनिंग देणं म्हणजे एखाद्या २ वर्षांच्या मुलाला काम शिकवण्यासारखं आहे," असं ते सांगतात. ते रोज १६० ते २६० वेळा एकच काम करतात. दिवसातून २०० वेळा भांडी घासणं किंवा टेबल पुसणं, ही त्यांच्या शरीराची सहन करण्याची शेवटची मर्यादा असते.

सुट्टीत पार्ट-टाइम काम करून पैसे कमवू पाहणाऱ्या कॉलेजच्या मुलांनाही या नोकरीने भुरळ घातली आहे. उत्तर चीनमधला २२ वर्षांचा विद्यार्थी सन सांगतो की, डे शिफ्टसाठी सुमारे १,७०० रुपये आणि नाईट शिफ्टसाठी १,९०० रुपये मिळतात. पण शारीरिक आणि मानसिक त्रासापुढे हा पैसा काहीच नाही, असं सांगत अनेक तरुण काही आठवड्यांतच ही नोकरी सोडून देतात.

44
घरबसल्या काम करण्याची संधी
Image Credit : x

घरबसल्या काम करण्याची संधी

प्रत्येकाने ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊनच काम केलं पाहिजे, अशी सक्ती नाही. पूर्व चीनमध्ये राहणाऱ्या गुओ होंगजुआन यांच्यासारखे काही लोक घरबसल्या रोज सुमारे ६ तास काम करतात. पुस्तके रचून ठेवणं, टेबल पुसणं यांसारख्या घरकामांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्या महिन्याला सुमारे ५७,००० रुपये कमवतात. कुटुंब आणि मुलांची काळजी घेत काम करण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचं त्या सांगतात.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जागतिक बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
World Best Cities : जगातलं नंबर 1 शहर कोणतं माहितीये? पाहा टॉप 7 बेस्ट सिटीजची लिस्ट
Recommended image2
Norway Oil Rig Job : वर्षाला सव्वा कोटी पगार, 250 दिवस सुट्टी; तरीही नोकरी करायला कुणी तयार नाही, कारण काय?
Recommended image3
Beth Dobbin : ऑलिम्पिक धावपटू बेथ डॉबिनची दुर्दैवी अवस्था, दिवसाचे २२ तास अंथरुणावर
Recommended image4
AAPL Stock: आयफोन ड्युओची तुफान मागणी, डिलिव्हरी थेट डिसेंबरवर
Recommended image5
Chinese Couple: नवरदेव आणि नवरीचं नाव एकच! चीनमधील या जोडप्याची भन्नाट लव्हस्टोरी
Related Stories
Recommended image1
Norway Oil Rig Job : वर्षाला सव्वा कोटी पगार, 250 दिवस सुट्टी; तरीही नोकरी करायला कुणी तयार नाही, कारण काय?
Recommended image2
World Best Cities : जगातलं नंबर 1 शहर कोणतं माहितीये? पाहा टॉप 7 बेस्ट सिटीजची लिस्ट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved