Tension In Nepal After Hindu Muslim Clash : नेपाळमध्ये 'जनरेशन झी'च्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली असून, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
Tension In Nepal After Hindu Muslim Clash : अलीकडेच 'जनरेशन झी'च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली असून, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन मुस्लिम तरुणांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, काही समाजकंटकांनी एक मशिदीत तोडफोड केली. या घटनेमुळे हिंसाचार सुरू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
धनुषा जिल्ह्यातील कमला नगरपालिकेतील हैदर अन्सारी आणि अमानत अन्सारी नावाच्या व्यक्तींनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. याला विरोध करत हिंदूंनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, यानंतर लगेचच कमला भागातील एक मशीद काही समाजकंटकांनी पाडली. यानंतर हिंसाचार सुरू झाला आणि संतप्त जमावाने बीरगंजमधील पोलीस ठाण्याची तोडफोड केली.
संचारबंदी लागू
तणावपूर्ण परिस्थितीमुळे बीरगंज शहर आणि आसपासच्या नागवा-इनर्वा, सिर्सिया नदी, गंडक चौक, शंकराचार्य गेट या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
भारत-नेपाळ सीमा बंद
सुरक्षेच्या कारणास्तव भारत-नेपाळ सीमा भारताने पूर्णपणे बंद केली आहे. सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.


