सार

Sunita Williams Return : अंतराळातून अखेर 9 महिन्यानंतर सुनिता विल्यम्स सुखरुप पृथ्वीवर परतल्या आहेत. अशातच सुनीता विल्यम्स यंच्या यशस्वी लँडिंगसाठी नासाने स्पेसएक्सला धन्यवाद देत म्हटले की, हे मिशन आव्हानात्मक होते.

Sunita Williams Return Video : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत. सुनिता विल्यम्स यांच्यासोबत बुच विल्मोर देखील 9 महिने अंतराळात अडकले होते. हे दोघेही सुखरुपपणे पृथ्वीरर आले आहेत. सुनिता विल्यम्स आणि बुच बिल्मोर यांच्या ड्रॅगन कॅप्सूलने भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 मिनिटांनी फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग केले आहे. या लँडिंगचा व्हिडीओही समोर आला आहे.

नासाने सुनिता आणि बुच यांच्या लँडिंगचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसून येतेय की, सुनिता विल्यम्स यांचे ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात लँडिंग करत आहे. यावेळी लगेच नासाची स्पीड बोट त्यांच्या कॅप्सूलपर्यंत पोहोचली जाते. यावेळी समुद्रात डॉल्फिनचा एक कळपही स्पॉट झाला आहे.

 

 

बोटीच्या माध्यमातून बाहेर पडले

कॅप्सूलचे लँडिंग झाल्यानंतर बोटीच्या माध्यमातून दोघांना बाहेर काढण्यात आले. या दोघांच्या लँडिंगपूर्वीच समुद्रात त्यांना रेस्क्यू करण्यासाठी काहीजण बोटीवर होते. पॅराशूटसह कॅप्सूलचे समुद्रात लँडिंग झाले. समुद्रात उतरल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत सुरक्षितता तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर कॅप्सूलचा दरवाजा उघडला गेला. कॅप्सूल समुद्रात उतरल्यानंतर लगेच दरवाजा उघडण्यात आला नाही. जेणेकरुन तापमान सामान्य होण्याची वाट पाहण्यात आली.

 

 

सुनिता विल्यम्स यांच्यासह चार अंतराळवीरांची समुद्रात सुरक्षितता तपासणी केल्यानंतर त्यांच्या कॅप्सूलला पाण्याबाहेर जहाजावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर आणण्यात आले. सर्व अंतराळवीरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सुनिता विल्यम्स यांनी सर्वांचे आभारही मानले.