पाकिस्तानच्या लष्कराने राहुल गांधी आणि सत्यपाल मलिक यांच्या व्हिडिओ क्लिप्स आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत सादर केल्या, ज्यात भारतातील अंतर्गत मुद्द्यांवर त्यांची विधाने भारतविरोधी पुरावे म्हणून मांडली. 

नवी दिल्ली – भारतातील आंतरराजकीय वादातून दिलेली विधाने आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताविरोधात प्रचारासाठी वापरण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने अलीकडेच आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या व्हिडिओ क्लिप्स सादर केल्या आहेत.

या क्लिप्समध्ये भारतातील अंतर्गत मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी केलेली विधाने, पाकिस्तानने अशा प्रकारे सादर केलीत की जणू ती भारतविरोधी पुरावे आहेत. विशेषतः पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सत्यपाल मलिक यांचे वक्तव्य आणि राहुल गांधी यांनी लष्कर आणि शासकीय निर्णय प्रक्रियेवर केलेली टीका, या गोष्टी पाकिस्तानने जागतिक माध्यमांसमोर "भारताच्या असंवेदनशीलतेचे दाखले" म्हणून मांडल्या आहेत.

भाजपची तीव्र प्रतिक्रिया: 

"हे देशहिताच्या विरोधात" या प्रकारानंतर भारतीय जनता पक्षाने कठोर प्रतिक्रिया नोंदवली असून राहुल गांधी आणि सत्यपाल मलिक यांच्यावर "देशद्रोही प्रचाराला अप्रत्यक्ष मदत" केल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्त्यांनी म्हटले की, “भारताच्या लोकतांत्रिक रचनेत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र ते राष्ट्रीय सुरक्षेच्या जबाबदारीसोबत येते. शत्रू राष्ट्र जर तुमच्या विधानांचा वापर करत असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे.”

राजकीय वक्तव्यांच्या आंतरराष्ट्रीय परिणामांचा धोका राजकीय विश्लेषकांच्या मते, ही घटना केवळ एक अपवाद नसून भारतीय राजकारणातील 'स्वातंत्र्य आणि जबाबदारी' यामधील समतोल ढासळत चालल्याचे लक्षण आहे. प्रोफेसर शरद कुलकर्णी म्हणतात, “प्रत्येक राजकीय नेत्याला माहित असले पाहिजे की, त्यांच्या एकेक शब्दाचा उपयोग देशाचे मित्र आणि शत्रू दोघेही करत असतात. भारतासारख्या जागतिक प्रभाव असलेल्या देशात नेत्यांनी केवळ देशाच्या जनतेला नाही, तर जागतिक व्यासपीठाला उत्तरदायी राहून बोलले पाहिजे.”