Saudi Man Marries 19 Year Old Girl Gifts Her Rolls Royce and 5kg Gold : सौदी अरेबियामध्ये एका 19 वर्षांच्या तरुणीने एका वृद्ध व्यक्तीशी आनंदाने लग्न केलंय. या लग्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, नवरदेवाने नवरीला रोल्स रॉयस कार आणि 5 किलो सोनं भेट दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Saudi Man Marries 19 Year Old Girl Gifts Her Rolls Royce and 5kg Gold : लग्न स्वर्गात ठरतात की नाही माहीत नाही, पण पृथ्वीवर होतात हे नक्की. कुणाचं लग्न, कधी आणि कसं होणार हे आधीच ठरलेलं असतं, असं काही जण म्हणतात. असो, सध्या सौदी अरेबियातील एका लग्नाची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. इथे एका 19 वर्षांच्या तरुणीने एका म्हाताऱ्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. या घटनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये गरिबीमुळे लहान मुलींची लग्नं श्रीमंत पण वयस्कर व्यक्तींशी लावून दिली जातात. पण इथे प्रकरण थोडं वेगळं आहे. या तरुणीने स्वतःच्या इच्छेने आणि आनंदाने या वृद्ध व्यक्तीशी लग्न केलं आहे. या लग्नाच्या व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, नेटकरी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

नवरीला मिळालं आयुष्य सेट करणारं गिफ्ट

हे लग्न फक्त मोठ्या वयाच्या अंतरामुळे चर्चेत नाही, तर नवरदेवाने नवरीला दिलेल्या महागड्या गिफ्टमुळेही चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, या वृद्ध व्यक्तीने आपल्या 19 वर्षांच्या पत्नीला एक आलिशान रोल्स रॉयस कार आणि तब्बल 5 किलो सोनं भेट म्हणून दिलं आहे.

नेटकऱ्यांनी काय म्हटलं?

या नव्या जोडप्याचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने लिहिलं, "तिला तिच्या भविष्याची चांगलीच जाणीव आहे. तिचं भविष्य सुरक्षित आहे. तिने तिचं भविष्य पैसा आणि त्याच्या वयासोबत जुळवून घेतलं आहे." तर दुसऱ्याने म्हटलं, "ती आनंदी असेल तर आपल्याला काळजी करण्याचं काय कारण?" आणखी एकाने लिहिलं, "पैसा आनंद देतो. पैशाने काहीही शक्य आहे." काही जणांनी तर हा व्हिडिओ AI ने तयार केला असावा, असाही अंदाज वर्तवला आहे.

पती-पत्नीमध्ये वयाचं अंतर किती असावं, यावर नेहमीच चर्चा होत असते. काही जण म्हणतात की हे अंतर एक-दोन वर्षांचं असावं, तर काही जण तीन-चार वर्ष योग्य मानतात. पण जास्त वयाचं अंतर असूनही अनेक जोडपी सुखाने संसार करत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र, या प्रकरणात वयाच्या अंतरापेक्षा त्या वृद्धाच्या श्रीमंतीचीच जास्त चर्चा होत आहे.

View post on Instagram