Pathankot Terrorist Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी ठार, गोळ्या झाडून केली हत्या

| Published : Oct 11 2023, 01:55 PM IST / Updated: Nov 07 2023, 10:37 AM IST

Shahid Latif

सार

Pathankot Terrorist Attack Mastermind Killed : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडची पाकिस्तानात हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतासाठी MOST WANTED असलेल्या दहशतवाद्याला गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे.

Pathankot Terrorist Attack Mastermind Killed : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहिद लतीफ (Terrorist Shahid Latif shot dead) असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

पाकिस्तानात लपून बसलेल्या या दहशतवाद्याला गोळ्या झाडून ठार करण्यात आल्याची माहिती आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात शाहिद लतीफचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. ठार झालेला हा दहशतवादी पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.

भारतीय जवानांवरील भ्याड हल्ला

वर्ष 2016मध्ये पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी (Pathankot Terrorist Attack Mastermind Killed ) हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed Terrorist)  या दहशतवादी संघटनेने हा भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते.

एनआयएच्या तपासात दहशतवादी शाहिद लतीफ हा या भ्याडा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने चार आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देऊन हा हल्ला घडवून आणला होता.

अज्ञातांनी केलं दहशतवाद्याला ठार

शाहिद लतीफ (Pathankot Attack Mastermind Shahid Latif Shot Dead) हा पाकिस्तानातील कुख्यात ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचा दहशतवादी होता. तो पाकिस्तानातील सियालकोटमध्ये लपून बसला होता. यादरम्यान बुधवारी (11 ऑक्टोबर) अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली.

शाहिद लतीफ भारतात होता जेरबंद

शाहिद लतीफला 12 नोव्हेंबर 1994 रोजी दहशतवादाच्या आरोपांतर्गत भारतात अटक करण्यात आली होती. तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला पाकिस्तानकडे पुन्हा सोपवण्यात आले होते. 

इतकी वर्षे तुरुंगवास भोगूनही त्यानं दहशतवादाचा मार्ग सोडला नाही. पाकिस्तानात पोहोचताच सियालकोटमध्ये बसून त्यानं पठाणकोट हल्ल्याचा (PathankotTerrorist Attack 2016) कट आखला. वर्ष 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमान हायजॅक प्रकरणातही शाहिद लतीफ सहभागी होता.

आणखी वाचा : 

Madhya Pradesh Crime : क्रूरता ! वडिलांचा जीव जाईपर्यंत काठीने बेदम मारहाण करत होता पोटचा मुलगा, कारण…

Girlfriend Murder Case : माथेफिरू प्रियकर! गर्लफ्रेंडची हत्या करून बॉयफ्रेंडनं स्वतःच्या गळ्यावरही केला वार, कारण…

ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च